घरमहाराष्ट्रमहावितरणाच्या आधुनिकीकरणावर १४ हजार कोटींचा खर्च; विजय सिंघल यांची माहिती

महावितरणाच्या आधुनिकीकरणावर १४ हजार कोटींचा खर्च; विजय सिंघल यांची माहिती

Subscribe

ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा शक्य

राज्यातील वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणच्या वीज वितरण प्रणालीचे आणखी सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी दिली.

राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेपैकी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च हा केवळ वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणावर होणार आहे. यामुळे वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार असल्याचा दावा सिंघल यांनी केला.
१४ हजार कोटींच्या निधीतून राज्यात विविध ठिकाणी ३७७ नवीन उपकेंद्र उभारली जाणार आहेत.

- Advertisement -

तर २९९ उपकेंद्रांत अतिरिक्त रोहित्र बसविले जाणार आहेत. २९२ उपकेंद्रांची क्षमतावाढ करून सुमारे २९ हजार ८९३ नवीन वितरण रोहित्रे बसविली जातील. याशिवाय उच्चदाब भूमिगत वाहिनी टाकण्यात येणार असून यामुळे ग्राहकांना २४ तास अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे सोयीचे होईल, असेही विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.

राज्यातील वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वाढवून आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे महावितरणच्या वीज वितरण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडून येतील. सशर्त आर्थिक सहाय्याद्वारे आर्थिक स्थिरता आणि परिचालन कार्यक्षमतेत सुधारणे करणे, वीज वितरण पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीजपुरवठ्याची गुणवत्ता तसेच उपलब्धता यात सुधारणा करणे अशी या योजनेची वै‍शिष्ट्ये आहेत, असेही सिंघल यांनी सांगितले.


हेही वाचा : पश्चिम उपनगरातील रस्ते होणार खड्डेमुक्त; ३,८०० कोटींचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -