Pune Girl Murder: पुण्यात कबड्डीपटू मुलीची हत्या करणारे ३ नराधम १२ तासात पोलिसांच्या ताब्यात

ही धक्कादायक घटना प्रेमप्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

मंगळवारी पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका १४ वर्षांच्या कबड्डीपटू मुलीवर तीन नराधमांनी कोयत्याने वार केले आणि संपूर्ण पुणे या घटनेने हादरुन गेले. मुलगी दररोज आपल्या वेळेप्रमाणे कबड्डी खेळण्याच्या सरावाला जात असताना तिच्यावर तीण जाणांनी कोयत्याने सपासप वार करुन तिची निर्घूण हत्या केली. या तीन जणांपैकी दोन जण त्वरित पोलिसांच्या हाती लागले होती. यातील एक फरारी आरोपी देखील पोलिसांच्या हाती लागला असून पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना प्रेमप्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेवर निषेध करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘एका अल्पवयीन मुलीवर अशाप्रकारे वार करण्याची ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंकृत शहारात एका मुलीची मैदानी खेळात अशाप्रकारे निर्घृण हत्या व्हावी हे सामाजिक अध:पतनाचे गंभीर लक्षण’ असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. यासंदर्भातील ट्विट देखील अजित पवार यांनी शेअर केले आहे.

वाचा अजित पवार यांची संतप्त प्रतिक्रिया 

नेमकं काय घडले?

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणारी एक १४ वर्षांची मुलगी तिथल्या स्थानिक कबड्डीसंघात खेळत होती. बिबडेवाडी येथे नियमित सरावाला गेली असती तिथे तिच्यावर तीन जणांनी कोयत्याने वार केले. त्यात मुलीचा मृत्यू झाला. यातील मुख्य आरोपी ऋषीकेश भागवत हा मुलीचा चुलत मावस भाऊ असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना तात्काळ अटक केली आणि एका आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढून बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरात लपून बसला होता. मात्र तिसऱ्या आरोपीला देखील १२ तासांच्या आत पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा – Pune Girl Murder: ‘सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद?’