घरCORONA UPDATECoronavirus In Maharashtra: आजही राज्यात १४ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Coronavirus In Maharashtra: आजही राज्यात १४ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Subscribe

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रोज १४ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची दिवसाला वाढ होत आहे. आजही १४,३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,४७,९९५ झाली आहे. राज्यात आज १,८०,७१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २३ हजार ७७५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ३३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३०, ठाणे ८, नवी मुंबई ९, कल्याण डोंबिवली मनपा ८, रायगड ६, नाशिक २७, जळगाव १३, पुणे ३६, पिंपरी चिंचवड मनपा २२, सोलापूर ९, सातारा ९, कोल्हापूर २२, सांगली २४, औरंगाबाद १२, नागपूर २१ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३३१ मृत्यूंपैकी २४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू हे ठाणे १२, नाशिक् ८, नागपूर ५, औरंगाबाद ३, सांगली २, धुळे १, हिंगोली १, कोल्हापूर १, लातूर १, रायगड १ आणि सातारा १ असे आहेत.

- Advertisement -

आज ११,६०७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,४३,१७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३९,३२,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,४७,९९५ (१९.०२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,०१,३४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३४,९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -