Eco friendly bappa Competition
घर ठाणे एसटीच्या ताफ्यात लवकरच १५० सीएनजी बसेस; प्रदूषण रोखण्यास लागले हातभार

एसटीच्या ताफ्यात लवकरच १५० सीएनजी बसेस; प्रदूषण रोखण्यास लागले हातभार

Subscribe

ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागात सद्यस्थितीत ५९ सीएनजी बसेस धाव असून त्या ताफ्यात आणखी १५० नव्या सीएनजी बसेस लवकरच दाखल होणार आहे. येवढ्या मोठया संख्येने दाखल होणाऱ्या बसेसाठी ठाणे जिल्ह्यात आणखी दोन सीएनजी पंप ही सुरू होणार असल्याने पंपाची संख्याही तीन होणार आहे. या येणाऱ्या बसेसमुळे प्रदूषण निश्चितच कमी होईल तसेच या बसेस दसऱ्यानंतर दाखल होतील, असा विश्वास ठाणे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर धावणाऱ्या एसटी बस बंद करून त्या जागी सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस महामंडळात ताफ्यात दाखल होणाऱ्या सुरुवात झालेली आहे. तर, ठाणे विभागाच्या ठाणे आगार १-२, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, शहापूर आणि बोरिवली या आगारातून दिवसाला ५५० गाड्यांची वर्दळ दररोज राज्यभर वर्दळ सुरू असते. दिवसाला या गाड्या अंदाजे एक लाख ५८ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. तर ठाणे विभागातून साध्या, निमसाधी, शिवशाही यासारख्या एकूण पाच प्रकारच्या गाड्या मार्गक्रमण करत आहे. ठाणे विभागात सद्यस्थितीत ५९ सीएनजी बसेस धावत असून त्या बसेस प्रामुख्याने ठाणे- बोरिवली, ठाणे – भाईंदर, ठाणे- पनवेल आणि ठाणे- भिवंडी या मार्गावर धाव आहेत. सीएनजी बसेसची संख्या वाढविण्याची मागणी केल्यानंतर १५० बसेस मिळण्याचा मार्ग सुकर झाली आहे. त्यानुसार त्या बसेस लवकरच दाखल होणार आहेत.

- Advertisement -

या बसेस दसऱ्यानंतर टप्प्या टप्याने दाखल होण्याची शक्यता आहे. या बसेसमध्ये सीएनजी भरण्यासाठी सीएनजी पंप स्टेशनची आवश्यकता असल्याने ठाणे खोपट पाठोपाठ विठ्ठलवाडी येथे पंप सुरू झाला आहे. तर भिवंडी येथे येत्या काही महिन्यात पंप सुरू होईल. तसेच या बसेसमध्ये सीएनजी भरल्यानंतर त्या बसेस ४०० ते ५०० किलो धावू शकणार आहेत. त्यामुळे या बसेस जास्तीत जास्त जिल्हा पातळीवर चालविल्या जाणार आहेत. तसेच त्या ठाणे-पुणे, ठाणे- अलिबाग आदी मार्गावर सोडल्या जाणार आहेत. या वाढणाऱ्या बसेसने ठाणे विभागातील सीएनजी बसची संख्या निश्चितच वाढणार आहे. अशी माहिती संबंधित विभागाने दिली.

” या १५० सीएनजीबाबत दुजोरा देत, या बसेस दसऱ्यानंतर ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने या बसेस ठाणे जिल्हा पातळीवर सोडल्या जातील. तसेच त्या बसेस पुणे ,रायगड, अहमदनगर या सारख्या जिल्ह्यात सोडण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.” अशी माहिती ठाणे विभागीय नियंत्रक अधिकारी विनोदकुमार भालेराव यांनी दिली आहे.


उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर- 21 येथील जलवायु विहार मध्ये भिंत कोसळून, 4 जणांचा मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -