मुंबई : विधानसभा निवडणुका संपताच 155 पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा मुंबई शहरात बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी या सर्व अधिकार्यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली होती. या बदल्यांच्या विरोधात काही पोलीस अधिकारी मॅटकडे गेले होते, मात्र मॅटकडून या अधिकार्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे या अधिकार्यांमध्ये नाराजी होती. अखेर 155 पोलीस अधिकार्यांची पुन्हा मुंबई शहरात बदली करण्यात आल्याने पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (155 police inspectors transferred back to Mumbai)
ज्या अधिकार्यांची मुंबईत बदली दाखवण्यात आली आहे, त्यात पुण्याचे शशिकांत जगदाळे, महेश पंढरीनाथ गुरव, अमरावतीचे योगेश चव्हाण, गोंदियाचे भागवत गरंडे, अशोक खोत, धनंजय सोनावणे, भंडार्याचे राजेश नंदीमठ, राजेश केवळे, गडचिरोलीचे रामपियारे राजभर, ज्ञानेश्वर गणोरे, सदानंद राणे, किशोर आव्हाळे, विनीत कदम, ठाण्याचे बळवंत देशमुख, निलेश बागूल, प्रवीण राणे, रवींद्र अडाणे, संजय मराठे, सुनील जाधव, मनीष शिर्के, गणेश पवार, जगदीश माने, इरफान शेख, ऋता नेमळेकर, विनोद गावकर, राज्य गुप्तवार्ता विभागाचे संजय निकम, विशाल राजे, खंडाळ्याचे फरीद खान, चंद्रकांत कांबळे, चंद्रपूरचे गबाजी चिमटे, मदन पाटील, मुंबई लोहमार्गचे राजीव चव्हाण, संतोष माने, राजेश शिंदे, अनघा सातवसे, संजय चव्हाण, मीरा-भाईंदर-वसई-विरारचे प्रमोद तावडे, सुवर्णा हुलवान, धनंजय शिंदे, अमित ताड, धनंजय कावडे, नवी मुंबईचे संजय परदेशी, विशेष सुरक्षा विभागाच्या सीमा ढाणे, प्रवीण पाटील, नागपूरचे मोहन पाटील, संजय काटे, महेशकुमार ठाकूर, सतीश गायकवाड, अशोक पारधी, विनोद गायकवाड, इक्बाल शिकलगार, वैशाल चव्हाण, गोपाळ भोसले, पुष्पक इंगळे, सुशीलकुमार गायकवाड, शिवाजी जाधव, विक्रम चव्हाण, फिरोज खान पठाण, विजय दंडवते, संजय ढोन्नर, गणेश सावर्डेकर, विजय मांडये, आदिनाथ गावडे, सतीश कावणकर, सुशांत सावंत, अनिल जायकर, वर्ध्याचे अनंत शिंदे, रविराज जाधव, रोहित खोत, विक्रांत शिरसाट, सांगलीचे रवींद्र मोहिते, सलीम खान, नानवीजचे मिलिंद नागपुरे, अनंत रावराणे, कोंडीबापू गायकवाड, विजयकुमार अंबरगे, सुरेश चोरट, प्रदीप पगारे, अतुल आव्हाड, प्राजक्ता पवार, कोल्हापूरच्या प्रमिला दौडकर, रत्नागिरीचे राजेंद्र काणे, बुलढाण्याचे राजू बिडकर, अकोल्याचे रवींद्र काटकर, चिमाजी आढाव, संदीप विश्वासराव, अरुण पोखरकर, अरविंद चंदनशिवे, प्रमोद भोवते, नितीन तडाखे, पंढरीनाथ पाटील, लातूरचे उमेश मचिंदर, संतोष धनवटे, अजय जोशी, नांदेडच्या मंजुषा परब, सागर शिवलकर, शैलेशकुमार अंचलवार, बीडचे केशवकुमार कसार, हिंगोलीचे जयवंत सपकाळ, परभणीचे दीपक दळवी, जालन्याचे मनीष श्रीधनकर, विलास दातीर, शशिकांत पवार, प्रितम बाणावली, नीलिमा कुलकर्णी, योगेश शिंदे, नाशिकचे अरुण सावंत, अनंत साळुंखे, उदय कदम, रमेश खिल्लारे, बापूसाहेब बागल, जळगावचे गौंडूराम बांगर, पालघरचे दत्तात्रय ठाकूर, गुन्हे अन्वेषण विभागाचे दुश्यंत चव्हाण, सतीश पवार, दीपशिखा वारे, शिवाजी पावडे, सोलापूरचे दत्तात्रय कोंकरे, दीपक शिंदे, संतोष कोकरे, लीलाधर पाटील, नितीन महाडिक, सुदर्शन चव्हाण, अनिल पाटील, सचिन शिंदे, दीपक जाधव, सुधाकर शितप, एटीएसचे दत्तात्रय पाटील, संतोष ढेमरे, मरोळ प्रशिक्षण केंद्राचे दत्तात्रय खाडे, रवींद्र कुडपकर, महेंद्र शिंदे, सचिन गवस, संजय खेडकर, छत्रपती संभाजीनगरचे अमोल टमके, महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रमोदकुमार कोकाटे, मनोज चाळके, पिंपरी-चिंचवडच्या ज्योती बागूल-भोपळे, श्रीनिवास चेवले, नागरी हक्क संरक्षणच्या जयश्री गजभिये, अजय क्षीरसागर, यवतमाळचे बाळकृष्ण देखमुख, राजेंद्र मचिंदर, धुळ्याचे विलास भोसले, सोमेश्वर खाटपे, सुनील यादव, रागिनी वाघमारे, संजय पवार, रायगडचे मधूसुदन नाईक यांचा समावेश आहे.
हेही वाचा – Kurla Bus Accident : दोन वकिलांची मानवाधिकार आयोगाच्या पॅनलकडे धाव; अपघाताला नवं वळण?