घरताज्या घडामोडीराजभवनात कोरोनाचा शिरकाव; १८ जणांना कोरोनाची लागण

राजभवनात कोरोनाचा शिरकाव; १८ जणांना कोरोनाची लागण

Subscribe

राजभवनात कोरोनाने शिरकाव केला असून आतापर्यंत १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता हा धोकादायक विषाणू राजभवनापर्यंत पोहोचला आहे. राजभवनातील एका इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर राजभनवातील तब्बल १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर इतरांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती स्थिर असून ते सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

राजभवनातील १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने राजभवनात सध्या चिंताजनक वातावरण पसरले आहे. तसेच या सर्व परिस्थितीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सर्वप्रथम राजभवनातील इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर राजभवनातील १०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे सर्व कर्मचारी राजभवर परिसरातील क्वॉर्टर्समध्ये राहतात. तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – Bachchan family : जया बच्चनसह ऐश्वर्या, आराध्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -