Corona In Maharashtra: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला १६ लाखांचा टप्पा!

Maharashtra Corona Update 9000 news corona positive patient and 180 deaths in 24 hours
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ९८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख १ हजार ३६५वर पोहोचली आहे. यापैकी ४२ हजार २४० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. आज राज्यातील १५ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यात एकूण १ लाख ७३ हजार ७५९ Active रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १ हजार ३६५ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान संपूर्ण जगातील कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी पार झाली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत ४ कोटी ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ११ लाख १९ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे ३ कोटी १ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – मुंबई लोकल सेवा सुरु करण्याची मविआ सरकारच्या या मंत्र्यांची मागणी