Mumbai Corona Update: कोरोनाचा कहर! मुंबईत कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ

मागील काही दिवासांपासून मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत काल ११ हजार ६४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. तर २ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आज (बुधवार) गेल्या २४ तासांत १६ हजार ४२० इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर ८ लाख ३४ हजार ९६२ इतके रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोना रूग्ण बरे झालेल्या रूग्णांचा दर ८७ टक्के इतका आहे.

मुंबईतील एकूण सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १ लाख २ हजार २८२ इतकी आहे. तर मागील २४ तासांत १४ हजार ६४९ इतक्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड वाढीचा दर ५जानेवारी ते ११जानेवारी पर्यंत १.८५ टक्के इतका आहे.

मुंबईत लक्षणं नसलेल्या बाधितांची संख्या १३ हजार ७९३ इतकी आहे. तर रूग्णालयात ९१६ रूग्णांना दाखल करण्यात आले आहे. तसेच ऑक्सिजन बेडवरील रूग्णांची संख्या ९८ इतकी आहे. त्याचप्रमाणे ६ हजार ९४६ इतके रूग्णांना दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील मृत्यूंची संख्या पाहिली असता २४ तासांत ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत एकूण ६७ हजार ३३९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : Mumbai Corona Update: दिलासादायक! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट