घरताज्या घडामोडीCoronavirus: चिंताजनक! औरंगाबाद जिल्ह्यात नवीन रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ

Coronavirus: चिंताजनक! औरंगाबाद जिल्ह्यात नवीन रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज औरंगाबादमध्ये सर्वाधिक १६३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ८१९वर पोहोचला आहे. तर यापैकी २०३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. आज वाढलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मनपा क्षेत्रांतील ११२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ५१ नवे रुग्ण आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात २ हजार ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १ हजार ५६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आज आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५५ महिला आणि १०८ पुरुषांचा समावेश आहे. २३ जून रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता गोरखेडा येथील ५५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये, जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण ५४, घाटीमध्ये १४८ आणि जिल्हाय सामान्य हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांचा आकडा २०३वर पोहोचला आहे.

- Advertisement -

राज्यात सोमवारी तब्बल ३ हजार ७२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३५ हजार ७९६ वर गेला आहे. यापैकी ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू असून ६७ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असे असले, तरी गुरुवारी दिवसभरात राज्यात ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ६ हजार २८३ च्या घरात पोहोचला आहे. तर राज्यातील मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे


हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे कोरोनाचे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -