घरताज्या घडामोडीचिंता वाढली! औरंगाबादमध्ये उपचारानंतर ५ बाधितांचा मृत्यू; मृतांचा आकडा ३३५

चिंता वाढली! औरंगाबादमध्ये उपचारानंतर ५ बाधितांचा मृत्यू; मृतांचा आकडा ३३५

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत असून आज १६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा कहर कायम असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती शासकीय रुग्णालय घाटी येथील प्रशासनाने गुरुवारी दिली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल ३३५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्यासोबत मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पैठण येथील ५६ वर्षीय पुरुष, गणेश कॉलनी येथील ८० वर्षीय वृद्ध महिला, सिल्लेखाना येथील ४२ वर्षीय पुरुष, अरिश कॉलनी येथील ७४ वर्षीय पुरुष, कन्नड देवगा रंगारी येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

आज आढळले १६६ बाधित

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश असून यामध्ये ९० पुरुष तर ७६ महिलांचा समावेश आहे.

बाधितांची संख्या ७ हजार ५०४

आतापर्यंत ७ हजार ५०४ बाधित रुग्ण आढळून आले असून यातील ४ हजार ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३३५ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या ३ हजार १३६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ; सुरक्षा भिंतीवरुन मारली उडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -