घरताज्या घडामोडीCorona: पुण्यात एका रात्रीत १६८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ!

Corona: पुण्यात एका रात्रीत १६८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ!

Subscribe

महापालिकेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसामान्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात सातत्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात एका रात्री १६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार ६८३वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ६३९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत पुण्यातील १० हजार ६०१ रुग्ण कोरोनावर मात केली आहे.

पुणे महापालिकेतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेत सर्वसामान्यांना प्रवेश बंदी करण्यात आला आहे. मनपा भवानात कालपासून आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पालिकेत कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र असे असूनही पालिकेतील गर्दीचे प्रमाण कमी होत नव्हते. त्यामुळे महापालिकेत सर्वसामान्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्या प्रमाणेचे रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४ हजार १६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना काल घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात काल ३ हजार ५३० रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


हेही वाचा – Coronavirus : चिंता कायम! औरंगाबादमध्ये दिवसभरात २३० कोरोनाबाधित रुग्ण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -