घरमहाराष्ट्रमहाड तालुक्यात वीज पडून १७ जण जखमी

महाड तालुक्यात वीज पडून १७ जण जखमी

Subscribe

वीज पडून महाड तालुक्यात मुमुर्शी आदिवासी वाडीतील १७ जण जखमी झाले असून जखमींना प्राथमिक विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

महाड तालुक्यात मुमुर्शी आदिवासी वाडी येथे वीड पडून १७ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत जखमी झालेल्याना तात्काळ विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

गेले काही दिवस दररोज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणात विजा चमकत सायंकाळी सुरु झालेल्या पावसाता मुमुर्शी आदिवासी वाडीवर वीज कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे आदिवासीवाडीतील झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, सायंकाळी आपले काम उरकून झोपडीत आलेल्या आदिवासींच्या अंगावर वीज पडल्याची घटना घडली. यामध्ये झोपड्यांमध्ये राहणारे १७ जण विजेच्या धक्क्याने जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना त्वरित विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या झखमींवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

जखमींची नावे

  • हिरा निकम (२५)
  • विलास पवार (३०)
  • सीता जाधव (३२)
  • रमेश जाधव (१७)
  • दत्ताराम पवार (३२)
  • चंद्रा पवार (३०)
  • शांताराम काटकर (५५)
  • भीमा काटकर (४५)
  • मंदा पवार (३२)
  • सनी पवार (१५)
  • सुषमा जाधव (२८)
  • सुजाता जाधव (६०)
  • रेश्मा वाघमारे (१८)
  • रुपेश पवार (९)
  • निकिता पवार (१३)
  • तारा पवार (५०)
  • दिशा पवार (१)

    हेही वाचा – मुंबई – पुणे महामार्ग आज दोन तास बंद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -