Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संतापजनक, मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार,चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संतापजनक, मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार,चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पीडित 17 वर्षीय तरुणीचा 29 जुलै रोजी तिच्या नातेवाइकांसोबत वाद झाल्याने रागाच्याभरात तरुणीने घराबाहेर पाऊल टाकले.

Related Story

- Advertisement -

नागपूरमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. मदतीच्या बहाण्याने एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तब्बल सहा जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी घटना रविवारी दुपारी सीताबर्डी मध्ये घडली असून यामुळे संपुर्ण राज्यातून या घटनेवर आक्षेप नोंदवला जात आहे. सीताबर्डी पोलिसांनी या घटनेतील चार रिक्षाचालकांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

पीडित 17 वर्षीय तरुणीचा 29 जुलै रोजी तिच्या नातेवाइकांसोबत वाद झाल्याने रागाच्याभरात तरुणीने घराबाहेर पाऊल टाकले. यानंतर तिने रिक्षाचालकाला मानस चौकात सोडायला लावले. साना हा रिक्षात बसला होता .रिक्षाचालकाने तरुणी चिंतेत आहे हे जाणून तिची चौकशी करण्यास सुरूवात केली. पण तरुणीने समोरील व्यक्तीला काहीच सांगितले नाही. मदतीच्या बाहाण्याने टिमकी परिसरातील एका घरी नेले. तेथे त्याने अन्य चार साथीदारांसह मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्यानंतर सानाने तिला मेयो हॉस्पिटल चौकात तिला सोडले. यानंतर पुन्हा एकदा एका रिक्षाचालकाच्या तावडीत ती सापडली अमानुष कृत्य करत त्याने साथीदाराच्या मदतीने रिक्षातच पीडित मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तसेच मुलीला मेयो चौकात टाकून देत तिथून त्यांनी पळ काढला.

- Advertisement -

संबधीत घटना उघटकीस येतात सीताबर्डी पोलिसांनी तापास करण्यास सुरूवात केली आणि आरोपींना ताब्यात घेतले.मोहम्मद शहानवाज ऊर्फ साना मोहम्मद रशीद (वय २५ रा.) मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसूफ (वय २६),मोहम्मद मुशीर (२३ तिन्ही रा. मोमीनपुरा) आणि त्यांचा एक साथीदार अशी ताब्यात घेतलेल्या ओरोपींची नावे आहे.


हे हि वाचा- अहो, म्हणूनच… लहान मुलं झाली लठ्ठ!

- Advertisement -