देशात 24 तासांत 17 हजार 092 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. मागील 24 तासांत 17 हजार 092 नव्या कोराना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

  WHO Scientist Says People have to live with corona virus infection

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. मागील 24 तासांत 17 हजार 092 नव्या कोराना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, 14 हजार 684 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (17092 new corona patients in india and 978 covid 19 active cases in mumbai)

साप्ताहिक संसर्ग दर 3.56 टक्के

सध्या देशात 1 लाख 09 हजार 568 इतके सक्रिय रुग्ण आहे. देशातील साप्ताहिक संसर्ग दर 3.56 टक्के नोंदवला गेला असून मृत्युदर (Corona Death) 1.21 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत 978 रूग्णांची नोंद

राज्यात सर्वाधिक रूग्ण हे मुंबईत (Mumbai Corona) आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत 978 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, राज्यात काल चार कोरोना बाधितांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या रूग्ण बरे होण्याचा दर 97.85 टक्क्यांवर तर मृत्यूदर 1.85 टक्के इतका झाला आहे.

राज्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3 हजार 249 कोरोनाच्या (Maharashtra Corona) नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 4 हजार 189 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे.

नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लसीकरण हा कोरोनावर जालीम उपाय असल्याने देशभराताली नागरिकांना लस दिली जात आहे.


हेही वाचा – पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण भारतात मान्सून होणार सक्रिय