Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक! २ दिवसांत १८ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक! २ दिवसांत १८ रुग्णांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहयला मिळतोय. दरम्यान औरंगाबाद गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शहरात सहा महिल्यांच्या चिमुकलीसह १४ वर्षांच्या मुलावर घाटी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते. मात्र या उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. याचदरम्यान २८ मार्चच्या मध्यरात्रापासून आत्तापर्यंत घाटी रुग्णालयात १८ बाधितांची माहिती समोर आली आहे.

ब्रिजवाडीतील सहा महिन्यांच्या चिमुकलीला २७ मार्चला गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तिचा सोमवारी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जुबली पार्क परिसरातील १४ वर्षीय मुलाला २३ मार्चला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. याचवेळी सोमवारी मध्यरात्री घाटी रुग्णालयात सोमवारी मध्यरात्री १२ नंतर आत्तापर्यंत १८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६०८ वर पोहचली आहे. तर गेल्या २४ तासांत १२७२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या ८०,०२१ झाली आहे. तर एकूण १२०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण ६२,७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


 

- Advertisement -