घरCORONA UPDATE२४ तासांत राज्यात १८६२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद, तर ७ रुग्णांचा मृत्यू

२४ तासांत राज्यात १८६२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद, तर ७ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलंय. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ८६२ नव्या कोरोनाबधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात एकूण २०१९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील मृत्यूदर हा १.८३ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७८,९३,७६४ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.०१ टक्के इतकं झालं आहे.

२४ तासांत मुंबईत ४१० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

- Advertisement -

मुंबईत दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांत मुंबईत ४१० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत २७९ रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले एकूण रूग्ण ११०४२६१ इतके आहेत. मुंबईत एकूण २ हजार २३५ रूग्ण सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे कोविड दुप्पटीचा दर २६२१ इतका आहे.

- Advertisement -

देशात १७ हजार १३५ नवीन रुग्णांची नोंद

देशात आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मागील चार दिवस कोरोना रुग्णांचा आलेख घटल्याचं पाहायला मिळाला. गेल्या २४ तासांत देशात १७ हजार १३५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच बुधवारी दिवसभरात १९ हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


हेही वाचा : मुंबै बँकेवर दरेकरांची वर्णी लागण्याची शक्यता, मविआला धक्का


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -