घरCORONA UPDATEठाणे जिल्ह्यात १८८ नव्या रुग्णांची भर, तर तिघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात १८८ नव्या रुग्णांची भर, तर तिघांचा मृत्यू

Subscribe

ठाणे: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे म्हटले जात असताना, आता नव्याने कोरोना रुग्णांसह या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गुरुवारी अचानक वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १८८ नव्या रुग्णांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली. तर सक्रिय रुग्णांचा आकडा हा आता एक हजार ५५५ इतका झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून शासनाने देखील कोरोना निर्बंध देखील शिथिल केले, असे असले तरी अद्यापही कोरोना आजार हा पूर्णतः संपुष्टात आला नसून आजही जिल्ह्यात कधी २०० तर कधी ३०० नव्या रुग्णांचा आकडा अधूनमधून पुढे येत आहे.

- Advertisement -

मागील अनेक महिन्यांपासून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ० ते २ इतकी होती. मात्र, गुरुवारी जिल्ह्यात नव्याने १८८ रुग्णांची भर पडली त्याचबरोबर या आजाराने, तिघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. यामध्ये ठामपा क्षेत्रात ५० नवे रुग्णांची तर,एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवलीत २८, नवी मुंबईत ८०, उल्हासनगरात ९ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. भिवंडीत एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. तर, मीरा-भाईंदरमध्ये ६ रुग्णांसह एक रुग्ण दगावला आहे. तसेच कुळगाव बदलापूर येथे एक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ग्रामीण भागात नव्याने ५० रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : …ऐक यापुढे देशाला मध्ये आणू नकोस, अफगाण क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी शोएब अख्तरला खडसावले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -