घरमहाराष्ट्र‘किटकॅट’च्या पाकिटांमध्ये सापडला १९ किलो गांजा

‘किटकॅट’च्या पाकिटांमध्ये सापडला १९ किलो गांजा

Subscribe

मनमाड रेल्वे पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार काकीनाडा एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली असता ४ प्रवासी बॅगांमधून सुमारे किटकॅट कॅडबरीची जम्बो १२ पाकिटे जप्त केली. या पाकिटांमध्ये गांजा भरलेला आढळून आला. पोलिसांनी ही पाकिटे तात्काळ जप्त केली. या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गांजा तस्करी करणार्‍यांचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

काचीगुडा येथून शिर्डीकडे जाणारी काकीनाडा एक्स्प्रेस मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई रेल्वे स्थानकावर थांबलेली असताना इथे कामावर असलेल्या रेल्वे पोलिसांनी जनरल डब्यातील प्रवाशांच्या बॅगा तपासायला सुरुवात केली. तेव्हा डब्यात शौचालयाजवळ त्यांना 5 बॅगा बेवारसपणे आढळून आल्या. या बॅगांबाबत त्यांनी प्रवाशांकडे विचारपूस केली असता मालक कुणीच आढळला नाही. त्या बॅगा उघडून पाहिल्या असता त्यामध्ये किटकॅट चॉकलेटची बारा मोठी पॅकेट आढळून आली. त्यात चॉकलेट असावीत असा आरपीएफचा समज होता, मात्र पॅकेट उघडून पाहिल्यावर त्यात चक्क गांजा निघाला.

- Advertisement -

हा गांजा मोजला असता तो सुमारे १९ किलो भरला असून त्याची बाजारात दीड लाख रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या गांजाची तस्करी आंध्र प्रदेशातून केली जात असावी असा संशय पोलीस आणि आरपीएफ यांना असून येथे आणल्यानंतर तो कोणाला द्यायचा होता याचा तपास केला जात आहे. दरम्यान या गांजाची तस्करी आंध्र प्रदेशातून केली जात असावी असा संशय पोलीस आणि आरपीएफ यांना असून येथे आणल्यानंतर तो कोणाला द्यायचा होता याचा तपास केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -