घरताज्या घडामोडीCoronavirus: पुण्यात एका रात्रीत १९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Coronavirus: पुण्यात एका रात्रीत १९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Subscribe

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाची रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुण्यात १२ तासांत तब्बल १९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार ४३वर पोहोचला आहे. तर यापैकी ६१७ रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत १० हजार २८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ६ हजार १३८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता आलेल्या पुण्याची आकडेवारी ही काल रात्री ९ ते सकाळी ९ दरम्यानची आहे.

मंगळवारी पुण्यात ८२० कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली होती. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून मास्क वापरण्याबाबत देखील कठोर पावलं उचलली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पुणे सारख्या इतर शहरांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क न घातला बाहेर पडल्यास ५०० ते १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची आकडा १ लाख ३९ हजार १०वर पोहोचला असून ६ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबादमध्ये चिंता कायम, कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -