घरCORONA UPDATECorona Live Update: दादर-माहिमकरांपुढील टेन्शन कायम

Corona Live Update: दादर-माहिमकरांपुढील टेन्शन कायम

Subscribe

दादर-माहिमकरांपुढील टेन्शन कायम

धारावीत दिवसभरात अवघे १३ रुग्ण आढळून आले असून आता धारावीतील रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र, दादर आणि माहिममध्ये धारावीच्या दुप्पट ते तिप्पट रुग्ण वाढत आहे. दादरमध्ये २९ आणि माहिममध्ये ३२ रुग्ण आढळून आले आहेत. दादर-माहिम विधानसभा क्षेत्रात ६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील रुग्ण कमी होण्याचा आनंद असला तरी माहिम-दादरकरांच्या पोटात वाढत्या रुग्ण संख्येमुळे गोळा आला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मुंबईमध्ये कोरोनाचे १३०० नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतानाच दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल १३०० नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता ७५ हजार ४७ इतका झाला आहे. त्यासोबतच आज दिवसभरात २३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आता मुंबईतल्या मृतांचा आकडा देखील ४ हजार ३६९च्या घरात गेला आहे. आजच्या दिवसातली दिलासादायक बाब म्हणजे २४ तासांत ८२३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळे कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ४३ हजार १५४ इतका झाला असून मुंबईतल्या अॅक्टिव रुग्णांची संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

राज्यात रविवारी ५४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ६४ हजार ६२६ झाली आहे. तर ७०,६०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात १५६ मृत्यू झाले असून मृतांची संख्या ७ हजार ४२९ झाली आहे. मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. राज्यात नोंदविलेल्या १५६ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ९६ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, ठाणे २४, जळगाव ६, जालना १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे. रविवारी २३३० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८६,५७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के एवढे झाले आहे. (सविस्तर वाचा)


भिवंडीत कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजाराचा टप्पा पार केला तर रुग्णांच्या मृतांचा आकडा देखील शंभरी पार केला असताना विशेष लॉकडाऊन सुरु असताना  प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीनबत्ती ते नजराणा कंपाउंड येथील मुख्य भाजीपाला मार्केट रात्रभर  सुरु असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढत आहे कारण याच गजबजलेल्या  परिसरात महापालिका वसाहत असून या वसाहतीमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहे तर याच परिसरात तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, महत्वाची बाब म्हणजे इथं भाजी विक्रेते येथील स्थानिक रहिवाशी नसून ते भाजी विक्रेते ज्या परिसरात राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत  त्याच परिसरातील भाजी विक्रेते आहे.

तर हे भाजी विक्रेते  कोणत्याच प्रकारे मास्क लावत नाही सोशल डिस्टंसिंग चे पालन होत नसून हॅंग्लोज वापरात नाही तर सेनेटाईझर पाहायला सुद्धा मिळत नाही   हे भिवंडी शहरातील मुख्य भाजीपाला मार्केट असल्याने शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने  शहरात आणि ग्रामीण भागात कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. पंकज आशिया  यांनी लक्ष देऊन कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


नागरिकांनी रुग्ण नेण्यासाठी रुग्ण वाहिकाचा वापर करावा – आयुक्त डॉ . पंकज आशिया

कोरोना   रुग्णांची शहरातील वाढतील संख्या विचारात घेता या रुग्णांना तातडीने औषधोपचार करता  रुग्णालयात न्यावे लागत आहे. याकामी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासते ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी तातडीने प्रत्येक प्रभाग समिती निहाय दोन दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. याकामी प्रत्येक प्रभाग समिती मधील आपत्कालीन कक्ष येथे नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे व  त्यांच्या कार्यालय नंबर व मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मुख्य आपत्कालीन कक्ष  प्रमुख फैझल तातली  यांचे  नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्या ठिकाणी देखील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपत्ती निकडीच्या कामाकरिता पालिकेत आपत्कालीन कशात  नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या ठिकाणी २४ तास अधिकारी कर्मचारी उपस्थित असणार आहेत. नागरिकांना,  येणाऱ्या समस्या तसेच खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल  करताना येणाऱ्या अडचणी , अन्य तक्रारी सोडवण्यासाठी महानगरपालिकने टोल फ्री नंबर १८००२३३११०२  असा आहे, तर आपत्कालीन कशाचा नंबर २५००४९ , २३२३९८  असा आहे. या नंबरवर संपर्क साधावा,.असे आवाहन आयुक्त  यांनी केले आहे.    त्याचबरोबर टाटा आमंत्रा,  रईस हायस्कूल,ओसवाल हायस्कूल या कोरोणा केंद्रावर देखील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.तसेच नागरिकांनी, रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला रुग्णालय नेताना रुग्णवाहिकेत  न्यावे असे आवाहन देखील आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे. याच बरोबर इंदिरा गांधी हॉस्पिटल, टाटा आमन्त्रा येथे शववाहिका  उपलब्ध करून दिल्या आहेत. अशी माहिती आयुक्त यांनी दिली आहे.


डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. औषधांच्या निमित्ताने नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहे. यावर नियंत्रण यावे तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरता औषध दुकानांची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत औषधी दुकान सुरू राहतील.

अत्यावश्यक प्रसंगी रुग्णांनी दुकानाबाहेरील क्रमांकावर संपर्क केल्यास औषध उपलब्ध करून देण्यात येतील. एकाही रुग्णांला औषधांची कमतरता भासणार नाही, असे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे यांनी सांगितले आहे. इमर्जन्सी मध्ये 09702400111 , 09702665111 , 08691091055 या क्रमांक वर संपर्क करावा, असे आवाहन डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.


Corona: पुण्यात बाधितांचा आकडा २० हजारांवर; ६९३ रूग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. पुण्यात एका रात्रीत २४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढला

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सलग पाचव्या दिवशी औरंगाबादमध्ये २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज सकाळी तब्बल २०८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये १२२ पुरुष, ८६ महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण ४ हजार ९७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ४४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार २९० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एएनआय वृत्तसंस्थेने घेतलेली मुलाखत


राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. पुण्यात एका रात्रीत २४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात आजपासून सलून व्यवसायाला पुन्हा सुरूवात झाली असून दर दोन तासांनी सलून सेनिटाईझ करणे बंधनकारक आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधत आहेत. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६ वा एपिसोड आहे. कोरोनाच्या संकटामुळे काहींमध्ये ही चर्चा होत आहे की, हे संपूर्ण वर्षच चांगले नाही. २०२० हे वर्ष लवकर संपावे, असे म्हटले जात आहे. मात्र एक-दोन घटनांमुळे संपूर्ण वर्षाला दोष देणे योग्य नाही. भारतावर नेहमीच कठिण प्रसंग ओढवले आहेत. मात्र भारत दरवेळी संकटावर मात करून यशस्वी ठरला आहे. (सविस्तर वाचा)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, रविवारी दुपारी १.३० वाजता जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यात मिशन बिगीन अगेनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


भारतामध्ये गेल्या २४ तासांत ४१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १९ हजार ९०६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतात ५ लाख २८ हजार ८५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून त्यापैरी २ लाख ०३ हजार ०५१ हे अॅक्टीव्ह केसेस आहेत. तर ३ लाख ०९ हजार ७१३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


भारतामध्ये आतापर्यंत ८२ लाख २७ हजार ८०२ जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले असून काल २ लाख ३१ हजार ०९५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी २८ जूनला सकाळी ११ वाजता रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. ही माहिती स्वतः पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. देशातील कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केले.


भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के झाला आहे, सध्याच्या घडीला साधारणतः देशभरातले तीन लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर देशातील करोना रुग्णांचा मृत्यूदर हा अवघा ३ टक्के आहे, जो इतर देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. (सविस्तर वाचा)


करोना विषाणूमुळे चिंताजनक प्रकृती बनलेल्या रुग्णांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. करोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. (सविस्तर वाचा)


वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेक करोना व अन्य रुग्णांचे मृत्यू मागील दोन महिन्यांमध्ये झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. मुंबईतील या अत्यंत ज्वलंत विषयावर मुंबई उच्च न्यायालयात भाजप उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे आता मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील रुग्णांना एका क्लिकवर रुग्णवहिका उपलब्ध होणार आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -