घरमहाराष्ट्रराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण

राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण

Subscribe

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले आहे.

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झालं आहे. तर, नाशिक, उस्मानाबाद, पुणे या तीन जिल्ह्यांत ग्रामीण भागातील लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोल्हापूर, भंडारा, धुळे, नाशिक, सातारा, वर्धा, अहमदनगर, हिंगोली, गडचिरोली, लातूर, नागपूर, औरंगाबाद, नांदेड , जळगांव, परभणी आणि ठाणे जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील ९० टक्क्यांहून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

हेही वाचा – गोवर-रुबेलाची लस धोकादायक नाही

- Advertisement -

‘या’ ठिकाणी मोफत लसीकरण

गोवरमुळे भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्ण दगावतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. अशा गंभीर आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्यात ९ महिने ते १५ वर्षाखालील सर्व बालकांसाठी २७ नोव्हेंबर पासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आता ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही, अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी मोफत लसीकरण करण्यात येत आहे.

शाळा बाह्य बालकांचे लसीकरण करण्यासाठी एक विशेष फिरते पथक कार्यरत आहे. या लसीकरणाबाबत शंकांचे योग्य निरसन झाल्यामुळे पालक, शाळा देखील लसीकरणासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. या लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्यामुळे काही शाळांमधून सकारात्मक परिणाम दिसत आहे. लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच महापालिका क्षेत्रांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.
– एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -