Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ठाकरेंच्या कर्जतमधील फार्महाऊसमध्ये 2 हजारांच्या नोटा लपवल्या आहेत; राणेंचा आरोप

ठाकरेंच्या कर्जतमधील फार्महाऊसमध्ये 2 हजारांच्या नोटा लपवल्या आहेत; राणेंचा आरोप

Subscribe

2 हजारांच्या नोटा बंद झाल्यानं यांना मोठा झटका बसला आहे. कारण ठाकरेंच्या कर्जतमधील फॉर्महाऊसमध्ये दोन हजारांच्या नोटा लपवून ठेवण्यात आल्या आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे.

2 हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याची घोषणा 19 मे रोजी करण्यात आली. त्यानंतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांकडून या निर्णयावर टीका करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नोटबंदीवरुन मोदी सरकारला घेरले आता यावर नितेश राणे यांनी राऊतांना प्रतिप्रश्न करत, ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, 2 हजारांच्या नोटा बंद झाल्यानं यांना मोठा झटका बसला आहे. कारण ठाकरेंच्या कर्जतमधील फॉर्महाऊसमध्ये दोन हजारांच्या नोटा लपवून ठेवण्यात आल्या आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे.( 2 thousand notes hidden in Uddhav Thackeray s farmhouse in Karjat Nitesh Rane s serious accusation )

काळ्या पैशांचा सर्वात मोठा दलाल कलानगरमध्येच बसलाय

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर टीका करण्यापेक्षा तुझ्या मालकाने नंदकिशोर चतुर्वेदीकडे किती काळा पैसा ठेवला आहे, याचा हिशोब दे. ज्यादिवशी नंदकिशोरी चतुर्वेदी भारतात येईल आणि सत्य सांगेल ज्यादिवशी तो माहिती देईल तेव्हा कळेल की काळ्या पैशांचा सर्वात मोठा दलाल हा कलानगरमध्येच बसला आहे, असा आरोप राणेंनी ठाकरेंवर केला आहे.

कोविड काळात केलेला भ्रष्टाचार, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उकळलेले पैसे आणि सामनात जाहिरातींच्या नावांवर केलेला भ्रष्टाचार याचा पैसा ठेवायचा कुठे? असा प्रश्न आता ठाकरेंना पडत आहे. इतकचं काय तर युवासेनेतून तिकीट देण्यासाठी 2 करोड रुपये घेतले जात आहेत. असा घणाघातही राणेंनी यावेळी केला. निष्ठावान सैनिकांना मान सन्मान न मिळणं, हे दुर्दैव. उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती काहीही पैशाशिवाय मिळत नाही. पैसे द्या आणि तिकीट मिळवा, असा कारभार सुरु आहे, असं राणे यावेळी म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -