घरCORONA UPDATEOmicron Variant: राज्यात गुरुवारी २० ओमिक्रॉन बाधितांची नोंद

Omicron Variant: राज्यात गुरुवारी २० ओमिक्रॉन बाधितांची नोंद

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत संचार बंदी लागू

राज्यात आज ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ने कमी झाली आहे. आज राज्यात २० नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. नोंद करण्यात आलेल्या १४ रुग्णांची नोंद राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थाकडून करण्यात आली आहे. राज्यात आज नोंद करण्यात आलेल्या २० रुग्णांपैकी ६ रुग्ण पुण्यातील आहेत. पुणे मनपा येथील १ रुग्ण तर पुणे छावणी बोर्ड येथील ५ रुग्ण आहेत. तर मुंबईत ११ नव्या ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात २ आणि अहमदनगर जिल्ह्यात आज १ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ओमिक्राँन रुग्णांची संख्या १०८इतकी झाली आहे.

आज आढळलेल्या २० ओमिक्रॉन रुग्णांपैकी १५ रुग्ण हे आंतररष्ट्रीय प्रवासी आहेत. तर १ आंतरदेशीय प्रवासी तर ४ जण त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. यातील १ रुग्ण हा १८ वर्षाखालील असून ६ जण ६० वर्षांवरील आहेत. हे सर्व सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत. तसेच १२ रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, ७ रुग्णांचे लसीकरण झालेसे नाही. त्याचप्रमाणे १ रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.

- Advertisement -

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या वेळेत ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधासभेत ही माहिती दिली.

- Advertisement -

मुंबईत ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे त्यामुळे दुबईहून भारतात येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. मुंबईत आज ६८३ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या ३ हजार २२७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


हेही वाचा – Cororna Virus: राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू, अनिल परब यांची विधानसभेत माहिती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -