Chipi Airport : आणखी २० ते २५ फ्लाईट्स सिंधुदूर्गात आणणार – ज्योतिरादित्य शिंदे

कोकणातील ही सर्व विशेषता सिविलियेशनच्या मॅपमध्ये आणून देशभरात प्रसिद्ध करणार

20 to 25 more flights to Sindhudurg say center minister jyotiraditya shinde at inauguration of Chipi Airport
Chipi Airport : आणखी २० ते २५ फ्लाईट्स सिंधुदूर्गात आणणार -ज्योतिरादित्य शिंदे

बहुप्रतिक्षित सिंधुदूर्गच्या चिपी विमातळाचा लोकार्पण सोहळा (inauguration of Chipi Airport ) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) देखील उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, रामदास आठवले, आदिती तटकरे,उदय सामंत आदी नेते उपस्थित होते. केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Union Air Minister Jyotiraditya Shinde)  यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी ज्यातिरादित्य यांनी मराठीत भाषण करत चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुभेच्छा देत महाराष्ट्र सरकार आणि MIDCचे आभार मानले. आज एकाच ठिकाणी कोकणातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन आणि पहिल्या अलायन्स एअरच्या विमानाचे उड्डाण होत असल्याचे त्यांनी म्हटले.  ५३० किलोमीटरचे अंतर ५० मिनिटात पार केले जाणार आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रुपात २० ते २५ फ्लाईट्स सिंधुदूर्गात आणण्याचा आमचा मानस असल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. सिंधुदूर्गच्या धर्तीची दिव्यता, सुंदरता, इतिहास विश्वरुप घेईल हे तुमच्याप्रमाणे माझेपण स्वप्न आहे. मराठ्यांचे साम्राज्य असलेल्या दर्यातील सिंधुदूर्ग किल्ल्यांचा इतिहास विश्व स्तरावर नेण्याचा मानस असल्याचे देखील ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे.

वोकल टू लोकल आणि लोकल टू ग्लोबल करण्याचा प्रयत्न सिंधुदूर्गात करणार आहोत. पंतप्रधानांच्या विचारधारेच्या आधारावर त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास आठवले आणि मी एकत्र येऊन सिंधुदूर्गासाठी काम करणार आहोत. आज चिपी विमानतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पाच पक्षाचे नेते एका मंचावर आले आहेत. एकत्र येऊन काम केले तर अशक्यही शक्य होईल.दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली . महाराष्ट्रातील विमानतळांचा विकास आणि प्रगती करायची आहे. सिंधुदूर्ग महाराष्ट्रातील १४ वे विमानतळ आहे. वॅट एअर टर्बाइनवर फ्यूलचा निषेध करा. आम्हाला सिविलियेशनच्या महाराष्ट्रात चांगले प्रयोग हवे आहेत यावर विचार करा. यासंबंधी लवकरात लवकर निर्णय घ्यावा,असे ज्योतिरादित्य यांनी म्हटले.

आजपासून मुंबई ते सिंधुदूर्ग अलायन्स फ्लाईटची सुरुवात झाली आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे. तीन वर्षांपूर्वी दहा सीटर्सचे एक विमान आले होते. आणि आज त्याच ठिकाणी नव्या विमानाचा श्री गणेशा करण्यात आला असल्याचे ज्योतिरादित्य यांनी म्हटले.

कोकण आणि सिंधुदूर्गाची प्राकृतिक आणि सौदर्यपूर्ण विशेषता आहे. तांदुळ, कोकम,आंबे, काजू, मासे अशा विविध गोष्टींनी कोकणाचे सौंदर्य निर्माण झाले आहे. कोकणातील ही सर्व विशेषता सिविलियेशनच्या मॅपमध्ये आणून देशभरात प्रसिद्ध करायची आहे. गोव्याची प्रसिद्धता सिंधुदूर्गात आणून सिंधुदूर्ग एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून तयार करायचे असल्याचे देखील ज्यातिरादित्य यांनी म्हटले.

सिंधुदूर्गाची धर्ती केसरी धर्ती आहे आणि आज त्यात नवीन मुळ जन्माला येत आहेत या ठिकाणी नवीन सुरूवात होत. विमानतळाचे लोकार्पण करुन सिंधुदूर्गात एका नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. तीन दशकांचे स्वप्न पूर्ण झाले. कोकणाशी आमचे भावनिक आणि कौटुंबिक संबंध आणि रक्ताचे नाते आहे. सिंधुदूर्गला शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे. सिंधुदूर्ग आणि सिंधुदूर्गचा किल्ला त्यांच्या काळात निर्माण झाला होता. पोर्तुगाल, इंग्रजांची शक्ती आणि महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची विचारधार होता. आज मिळालेली आझादी शिवाजीमहाराजांमुळे आहे. त्यामुळे हा क्षण माझ्यासाठी भावूक असल्याचे ज्योतिरादित्य यांनी म्हटले.

 


हेही वाचा – Chipi Airport : बाळासाहेबांनी खोट बोलणाऱ्यांना थारा दिला नाही – नारायण राणे