धुळ्याच्या तरुणाचा मुंब्रा रेल्वेस्थानकातील भीषण अपघातात दुर्देवी मृत्यू

मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकात एका धुळ्याचा तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रामेश्वर देवरे (20) असे या तरुणाचे नाव होते. मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकची धडक लागल्याने रामेश्वरचा दुर्देवी मृत्यू झाला.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकात एका धुळ्याचा तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रामेश्वर देवरे (20) असे या तरुणाचे नाव होते. मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकची धडक लागल्याने रामेश्वरचा दुर्देवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना मुब्रा रेल्वे स्थानकात घडली. 20 वर्षीय रामेरामेश्वरच्या मृत्यूमुळे देवरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (20 year old youth came for agniveer bharti hit by mumbai local train at mumbra railway station)

नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर देवरे हा धुळे जिल्ह्यातील वडजाई या गावातील रहिवाशी आहे. रामेश्वर भारतीय सैन्याच्या अग्निवीरच्या भरतीसाठी मुंब्र्याला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याच्या गावातील आणि इतर आजूबाजूच्या गावातील एकून 30 तरुण आले होते. बुधवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास रामेश्वर आणि त्याचे मित्र कल्याण रेल्वे स्थानकात उतरले. तिथून ते मुंब्राला भरतीसाठी रवाना झाले. त्यावेळी मुंब्रा रेल्वे स्थानकात पोहोचले असता, रामेश्वरला पोटात मळमळ होऊ लागल्याने, तो उलटीसाठी रेल्वे रुळाकडे गेला आणि प्लॅटफॉर्मच्या कड्यावरुन खाली वाकून उलटी करत होता. त्यावेळी अचानक भरधाव लोकल ट्रेन आली आणि या लोकलची त्याच्या डोक्याला जोराची धडक बसली. त्यानंतर तो जवळपास 10 ते 15 फूट दूर फेकला गेला.

ही संपूर्ण घटना मुंब्रा रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाली. या दुर्घटनेत रामेश्वरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वडजाई गाव स्तब्ध झालं आहे. पंचक्रोशित या घटनेवर हळहळ व्यक्त केली जातेय. एक चांगला गुणी मुलगा गावाने गमवला, अशा शब्दांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. रामेश्वर याच्या पश्च्यात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, रामेश्वरने कॉम्युटर डिप्लोमा केलेला होता. तो नोकरीच्या शोधात होता. आयुष्यात सेटल होण्यासाठी आपल्याकडे नोकरी हवी. त्यासाठी तो नोकरीच्या शोधात होता. तो वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याकरता आग्रही असायचा. त्याने काही कोर्सेसही केले. तो सतत शिक्षण घेण्याचा विचारात असायचा. आपल्या आई-वडिलांना शेतातील कामात मदत करायचा. शेतात पिकवलेला भाजीपाला तो स्वत: विकायला जायचा आणि आई-वडिलांच्या हातात मोबदला द्यायचा.


हेही वाचा – मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बॉलिवूड कलाकारांचे तोंडावर बोट, चाहत्यांमध्ये मोठी नाराजी