धक्कादायक! धावत्या रेल्वेत तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

धावत्या रेल्वेमध्ये एका २० वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंबईमध्ये घडली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. दुपारी सव्वा एकच्या सुमारास डहाणू रोड आरएस येथे स्वराज्य एक्सप्रेसमध्ये तरूणीचा मृतदेह आढळून आला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आसपासच्या प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनला दिली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी संबंधित कोचचा दरवाज उघडला असता, २० वर्षीय तरूणी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

काय आहे नेमकी घटना?

रेल्वे मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते जम्मू-काश्मीरमधील श्री माता वैष्णो देवी कटरा पर्यंत जाणार होती. दरम्यान रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच
या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला. याठिकाणी तरुणीचा मृतदेह उतरवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने दिली. आरती कुमार असे मृत तरुणीचे नाव असून ती बिहार मधील रहिवाशी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली.

मृत तरूणी आरतीचा मृतदेह टॉयलेटमध्ये आढळल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले. त्यानंतर डहाणू रोड स्थानकात ही रेल्वे थांबवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२.३५ च्या सुमारास पश्चिम रेल्वेकडे स्वराज एक्स्प्रेसबाबत एक महत्वाचा कॉल आला. एक वीस वर्षीय मुलगी वॉशरुमला गेली होती पण बराच वेळपर्यंत ती परतलेली नाही, अशी माहिती या कॉलवरून देण्यात आली. त्यानंतर या गाडीला डहाणू रोड स्थानकात दुपारी १ वाजून १० मिनिटांनी विशेष थांबा देण्यात आला.

रेल्वे डहाणू येथे थांबल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ती तरुणी ज्या डब्यात होती, त्या डब्यातील बंद असलेल्या वॉशरुमचं लॅच उघडलं. त्यावेळी संबंधीत तरुणी वॉशरुममध्ये पडलेली आढळली. तिच्या गळ्याला एक कपडा गुंडाळलेला होता. यानंतर तिला तातडीनं बाहेर काढत येथील डहाणू कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पालघर रेल्वे पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा : कुर्ला परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन