Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे मेहुणीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्ष कारावास

मेहुणीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्ष कारावास

Subscribe

शिक्षणासाठी नवी मुंबईत मावशीकडे आलेल्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६१ वर्षीय मावशीच्या नवऱ्याला ठाणे विशेष पोस्को न्यायालयाचे न्यायाधीश के डी शिरभाते यांनी शुक्रवारी दोषी ठरवत, २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना २०१८ मध्ये नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तर या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले.

आरोपी हा ६१ वर्षीय असून तो मूळ पुण्याच्या राजगुरूनगर येथील रहिवाशी आहे. तसेच इलेक्ट्रीशन म्हणून काम करणारा आरोपी सध्या नवी मुंबईतील नेरूळ गांव येथे राहणारा आहे. आरोपीच्या मेहुणीची दहा वर्षीय मुलगी शिक्षणासाठी त्याच्याकडे राहण्यास आली होती. याचदरम्यान आरोपीने पीडित मुलीवर २०१८ मध्ये लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी भादवी कलम ३५४, ३७३ सह कलम ८ लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ अन्वये गुन्हा झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.

- Advertisement -

याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यावर हा खटला विशेष पोस्को न्यायालयाचे न्यायाधीश के डी शिरभाते यांच्या न्यायालयात सुरू झाला. यावेळी सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केले पुरावे आणि तपासलेल्या ७ साक्षीदारांची साक्ष ग्राहय मानून आरोपीला न्यायाधीश शिरभाते यांनी दोषी ठरवत, २० वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा भोगावी लागेल असे आदेश दिले आहेत. याप्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका गोरे यांनी केला तर कोर्ट पेहरवीचे काम पोलीस हवालदार प्रभाकर महाजन यांनी पाहिले.


हेही वाचा : Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा पुढील सामन्यात समावेश होण्याची शक्यता, मुंबईच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा


- Advertisement -

 

- Advertisment -