घर उत्तर महाराष्ट्र 'नाफेड' मार्फत केंद्राने 2 वर्षांत केला 200 कोटींचा घोटाळा; आरोपामुळे खळबळ

‘नाफेड’ मार्फत केंद्राने 2 वर्षांत केला 200 कोटींचा घोटाळा; आरोपामुळे खळबळ

Subscribe

नाशिक : केंद्र सरकारने ‘नाफेड’मार्फत नाशिकसह राज्यातील अनेक भागातुन गेल्या दोन वर्षात खरेदी केलेल्या कांदयातुन तब्बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा खळबळ जनक आरोप राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या आरोपाचे समर्थन भाजपाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी करत त्याविषयावर स्वतंत्र बैठकच आयोजित करावी अशी सुचना केली आहे. तर या खरेदी प्रकरणाची चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी, कांदा निर्यातदार व व्यापारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाफेडचे एमडी रितेश चौहान, जिल्हा उपनिबंधक, कृषी व पणन अधिकारी आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडुन नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातुन सध्या २ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्यात येत असून तो पारदर्शकपणे सुरु आहे.गेल्या वर्षी ३५० कोटी रुपयांचा अडीच लाख मेट्रीक टन कांद खरेदी करण्यात आला आहे. जर काही शेतकर्‍यांना नाफेडच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाला असे वाटत असेल तर त्यांनी त्याबाबत तक्रार व पुरावे द्यावेत.त्याची चौकशी केली जाइल असे अश्वासन नाफेडचे व्यवस्थापक मितेश चौहान यांनी दिले.

असा झाला घोटाळा

- Advertisement -

नाफेडद्वारे महाराष्ट्रातून २०२१ मध्ये १.५ लाख टन तर २०२२ मध्ये २.५ लाख टन कांदा खरेदी करण्यात आला होता. मात्र, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनच्या वतीने झालेल्या या कांदा खरेदीत पारदर्शकता न बाळगल्याने व्यापार्‍यांचा कांदा शेतकर्‍यांचा कांदा दाखवुन खरेदी करण्यात आला, ठरलेल्या भावापेक्षा कमी किंमत देण्यात आली आणि चाळींच्या भाड्यातही अनियमितताहोती. तसेच नाफेडकडुन थोड्या फार प्रमाणात खराब झालेला कांदा ४० ते ५० टक्के खराब दाखवुन त्यातही अनियमितता केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : तिढा सुटला! उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत, ‘या’ मागण्यांबाबतही केंद्रात पाठपुरावा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -