एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 2 हजार इलेक्ट्रिक बस, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

2000 electric buses will be added to ST convoy, announced Minister Anil Parab
एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 2 हजार इलेक्ट्रिक बस, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

एसटीने 75 व्या वर्षात नुकताच प्रवेश केला आहे. यानिमीत्त एसटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रीक बस दाखल झाली. ही बस पुणे-अहमदनगर मार्गावर सुरू करण्यात आली. या मार्गावर एसटीची पहिली बस धावली होती. या पार्श्वभूमीवर एसटीच्या ताफ्यात 2000 ईलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत, अशी घोषणा परीवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.

अशा दाखल होणार बस – 

एसटीच्या 2000 इलेक्ट्रिक गाड्या टप्प्या टप्याने येणार आहेत. यात 1000 गाड्या CNG गाड्या ताफ्यात घेणार, अशीही माहिती यावेळी परबांनी दिली आहे. तसेच यातील काही गाड्या एसटीच्या मालकीच्या तर काही भाडे तत्वावरील असणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न –

याबाबत बोलताना अनिल परब यांनी परिवहन विभागाच्या 115 पैकी 86 सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. लाखो लोकांना याचा फायदा होत आहे. महाराष्ट्रातील अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभाग काम करत आहे. तालुक्यात ब्लॅक स्पॉट किती आहेत? त्यात काय सुधारणा करण्यात आल्या? याचा अहवाल मागविण्यात आला आहे. लो स्पीड इलेक्टिक गाड्या हाय स्पीड ने पाळविल्या जात आहेत. त्यामुळे 2 हजार इलेक्टरीक गाड्यावर कारवाई करण्यात आली आहे, माहितीही परब यांनी दिली आहे.

प्रदूषण कमी होणार –

लो स्पीडचा फायदा घेत कोणी कायदा मोडत इसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल इलेक्ट्रीक वाहने लो स्पीड बनविण्याचे लायसन्स घेऊन हाय स्पीड केली जात आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली जाईल, असा इशारा परब यांनी यावेळी दिला. एसटीच्या ताफ्यातही इलेक्ट्रिक वाहने आल्याने सहाजिक प्रदूषण कमी होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात इंधन बचत होणार असल्याचे ही परब यावेळी म्हणाले