घरअर्थजगतआजपासून 'नोटबदली' ; 2000 ची नोट कशी बदलून घ्याल? जाणून घ्या...

आजपासून ‘नोटबदली’ ; 2000 ची नोट कशी बदलून घ्याल? जाणून घ्या सविस्तर

Subscribe

नोटबंदीच्या काळात आणलेलली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन असतील, पण लोकांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा कराव्यात, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे.

नोटबंदीच्या काळात आणलेलली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन असतील, पण लोकांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा कराव्यात, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे. RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी एक, दोन नाहीतर तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 23 मे 2023 पासून म्हणजेच, आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, लोक 2000 रुपयांच्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलू शकतील किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करु शकतील. ( 2000 rupee note exchange you can exchange 2000 notes from today here are all details )

काही महत्त्वाच्या बाबी

आरबीआयने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की, 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. नोट पूर्णपणे वैध आहे. तुम्हाला हव्या त्याठिकाणी खरेदी, व्यवहार यासाठई तुम्ही या नोटा वापरु शकता. तसचं दोन हजारांची नोट घेणं कोणीही नाकारु शकत नाही.

- Advertisement -

तसचं, ज्यांच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे ते कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन ती बदलून घेऊ शकतात. तुम्ही आजपासून म्हणजेच, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 20 हजारपर्यंत म्हणजेच, 2 हजारच्या 10 नोटा बदलू शकता.

ज्यांचं बँक खातं नाही असे लोकही नोटा बदलू शकतात. नोटा बदलण्यासाठी बँक खातं असण्याची गरज नाही, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात 2 हजाराची नोट जमा केली तर त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पाहिजे तेवेढे पैसे जमा करु शकता. बँकिंग डिपॉझइट नियमांनुसार, तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर तुमचे पॅन- आधार कार्ड दाखवावे लागेल.

2 हजारच्या नोटा का काढल्या?

2 हजार रुपयांच्या नोटा आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये या नोटा बाजारात आल्या होत्या. 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्यानंतर चलन आवश्यकतेमुळे या नोटा चलनात आल्या होत्या. त्यामुळे 2018-2019 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

( हेही वाचा: सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारमधील संघर्ष; १९६१ पासून फिरवले गेले निकाल )

30 सप्टेंबरनंतर 2 हजारच्या नोटांचं काय?

जे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा जमा करु शकणार नाहीत, त्यांना RBI कार्यालयात जाऊन त्या घ्याव्या लागतील. मात्र, आरबीआयने याबाबत अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -