घरCORONA UPDATECorona: आज औरंगाबादमध्ये २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण आकडा ४७२३वर!

Corona: आज औरंगाबादमध्ये २०१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण आकडा ४७२३वर!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा संख्या वाढत आहे. सलग चौथ्या दिवशी औरंगाबाद २०० हून अधिक रुग्ण आढळत आहेत. आज सकाळी तब्बल २०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून जिल्ह्यातील एकूण आकडा ४ हजार ७२३वर पोहोचला आहे. आज आढळलेल्या रुग्णांपैकी १२५ रुग्ण मनपा हद्दीतील तर ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये ११४ पुरुष आणि ८७ महिलांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात २ हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सध्या २ हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाला दिले आदेश

दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल औरंगाबाद खंडपीठाने घेतली आहे. कोर्टाने कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला विविध आदेश दिले आहेत. जे अधिकारी अद्याप कामावर हजर झाले नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची माहिती प्रशासनाला न देणाऱ्या खासगी दवाखाने आणि प्रयोगशाळांविरोधात कारवाई करून त्याचा अहवाल कोर्टापुढे सादर करण्याचा आदेश प्रशासना दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाखांवर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -