Corona In Maharashtra: आज २०,१३१ नव्या रूग्णांचे निदान; तर Recovery Rate ७१ टक्के

राज्यात आजपर्यंत एकूण ६,७२,५५६ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज

state corona update
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. राज्यात आज २० हजार १३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ६,७२,५५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आज २,४३,४४६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २७,४०७ वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर २.९ टक्के एवढा आहे.

मात्र दिलासादायक म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.२६ % एवढे झाले आहे. आज १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ६,७२,५५६ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात ३८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे १०, नवी मुंबई मनपा १, मीरा भाईंदर मनपा 3, रायगड २, पनवेल मनपा १, नाशिक १९, अहमदनगर ९, जळगाव १६, पुणे ५५, पिंपरी चिंचवड मनपा १३, सोलापूर १२, सातारा १६, कोल्हापूर २५, सांगली २८, औरंगाबाद ७, लातूर ४, उस्मानाबाद १, नांदेड ९, नागपूर ५६, अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३८० मृत्यूंपैकी २५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

उर्वरित ३० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३० मृत्यू पुणे ७, कोल्हापूर ७, औरंगाबाद ४, नाशिक २, सातारा २, ठाणे २, अमरावती १, धुळे १, जळगाव १, नागपूर १, उस्मानाबाद १ आणि रत्नागिरी १ असे आहेत. आज १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६,७२,५५६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४७,८९,६८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,४३,७७२ (१९.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,५७,३०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,१४१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


Corona : महाराष्ट्रासह ‘या’ चार राज्यात मिळून ७० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू