घरमहाराष्ट्रमुंबईत 204 , ठाण्यात 8 नवे करोना रुग्ण

मुंबईत 204 , ठाण्यात 8 नवे करोना रुग्ण

Subscribe

राज्यात मंगळवारी ३५० नवे करोनारुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या २६८४ इतकी झाली असून आतापर्यंत १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत मंगळवारी २०४ करोनारुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाबाधित १७५३ इतके झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला असून मंगळवारी त्यापैकी ११ जण मृत्युमुखी पडले आहेत.

तर ठाणे शहर आणि जिल्ह्यात 8 नवे रूग्ण सापडल्याने करोनारुग्ण ३१९ झाले असून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २५९ करोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, ही एक दिलासादायक बाब आहे. मंगळवारीराज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.

- Advertisement -

मंगळवारी झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ( ७२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कॅन्सर तर एकाला क्षयरोग होता. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६,५८८ नमुन्यांपैकी ४२,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २६८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

- Advertisement -

देशात १०३६३ करोनारुग्ण
देशातील करोना रुग्णांची संख्या १०३६३ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत १२११ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील मृतांची एकूण संख्या वाढून ३३९ इतकी झाली आहे. तर १०३६ जण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १७९ जणांना उपचारांनातर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -