घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नाशिकमध्ये ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

महापालिकेचे डॉक्टर कोरोनाबाधित; एकूण रूग्ण ५३२३

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर, परिचारिकांसह कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात रविवारी (दि.५) दिवसभरात 2७७ नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 56, नाशिक शहर २१७ आणि मालेगावातील 4 रूग्णांचा समावेश आहे. रूग्णांमध्ये नाशिक महापालिकेच्या नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण क्वारंटाईन सेंटरमध्ये रूग्णसेवा करणार्‍या डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रूग्णसेवा करणार्‍यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसभरात ७ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर ५ आणि ग्रामीणमधील २ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 5 हजार 389 रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात 2 हजार 940 रूग्ण आहेत.

नाशिक शहरात कोरोनाबधित रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने गंगापूर, मेरी, वडाळा, धात्रकफाटा येथे कोविड केअर सेंटर केले असून नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण होस्टेल क्वारंटाईन सेंटर केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित रूग्णांची सेवा करत आहेत. समाजकल्याण येथे कोरोनाबाधित रूग्णांसाठी ५०० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून सध्या १७४ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी रूग्णसेवा करणारे डॉक्टर बाधित आढळून आले असून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात आजवर 2 हजार 984 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 652, नाशिक शहर 1366, मालेगाव 876 आणि जिल्ह्याबाहेरील 90 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारअखेर 2 हजार 62 बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक ग्रामीण 521, नाशिक शहर 1376, मालेगाव 134 आणि जिल्ह्याबाहेरील 31 रूग्ण आहेत. त्यातील जिल्हा रूग्णालय 91, नाशिक महापालिका रूग्णालये 1357, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 126, मालेगाव रूग्णालय 67, नाशिक ग्रामीण रूग्णालय 301 आणि गृह विलगीकरण 120 रूग्ण आहेत.

- Advertisement -

दिवसभरात 662 संशयित रूग्ण दाखल
नाशिक जिल्ह्यात रविवारी ६६२ संशयित रूग्णांमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली असून त्या सर्वांना आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून विविध रूग्णालयांमध्ये दाखल केले अहे. यात जिल्हा रूग्णालय 13, नाशिक महापालिका रूग्णालय 494, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 7, मालेगाव रूग्णालय 10, नाशिक ग्रामीण रूग्णालय 120 आणि गृह विलगीकरण 18 रूग्ण आहेत.

नाशिक कोरोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-5389 (मृत-277)
नाशिक ग्रामीण-1229 (मृत-56)
नाशिक शहर-2940 (मृत-132)
मालेगाव शहर-1086 (मृत-76)
जिल्ह्याबाहेरील-134 (मृत-13)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -