घरक्राइमस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील २१४ कैद्यांना करणार जेलमुक्त

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील २१४ कैद्यांना करणार जेलमुक्त

Subscribe

यंदाच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील २१४ कैद्यांना सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. अतिरिक्त डीजी (तुरुंग) सुनील रामानंद यांनी सांगितलं की, आम्ही राज्यातील विविध तुरुंगातील २१४ आरोपींना सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यपालांची औपचारिक परवानगी घेतली जाणार आहे. (214 prisoners of Maharashtra will be freed from jail on the occasion of Independence Day)

तीन टप्प्यांत या आरोपींना सोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट रोजी, दुसऱ्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ आणि तिसऱ्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२३ सोडण्यात येणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२२ (स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव), २६ जानेवारी २०२३, (प्रजासत्ताक दिवस) आणि २५ ऑगस्ट २०२३ या तीन टप्प्यात कैद्यांना सोडण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सध्या ४३ हजार आरोपी विचाराधीन आहेत तर, ६ हजार कैदी आहेत.

‘घरोघरी तिरंगा’ आणि ‘स्वराज्य महोत्सवा’च्या आयोजनासाठी यंत्रणा सज्ज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ कार्यक्रम आणि ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या स्वराज्य महोत्सवासाठी राज्य शासनाच्या यंत्रणा सज्ज असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील दोन कोटी घरांवर तिरंगा झेंडा फडकविण्याची योजना आहे. यासाठी खाजगी व्यापारी, अन्य संस्था आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून १ कोटी झेंडे उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विकास विभागासाठी अपर मुख्य सचिव आणि नगर विकास विभागासाठी प्रधान सचिवांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्यसचिवांकडून या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वेळोवेळी आढावा बैठकाही घेण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या अभियानांतर्गंत विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ३५.४५ कोटींचा निधी जिल्हा स्तरावर वितरीत करण्यात आला आहे.

स्वराज्य महोत्सवांतर्गंत राज्य, जिल्हा,तालुका आणि ग्राम व वार्ड स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे. ग्रामस्तरावर आणि वॉर्ड स्तरावर विशेष सभांचे आयोजन, शाळा महाविद्यालये, अंगणवाडया, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट,शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक आदिंच्या सहकार्याने हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -