घरCORONA UPDATEलातूरमध्ये कोरोनाचा धोका वाढला! नवरदेवासह तब्बल २३ जण बाधित

लातूरमध्ये कोरोनाचा धोका वाढला! नवरदेवासह तब्बल २३ जण बाधित

Subscribe

लातूरमधील लग्न वऱ्हाड्यातील नवरदेव आणि त्याच्या आईसह २३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच दुसऱ्याबाजूला लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील एका धार्मिक कार्यक्रमामधील एकत्र आलेल्या लोकांपैकी तब्बल १३ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे लातूरमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठी भर पडली आहे. याच कारणामुळे आता अहमदपूरमधील कोविड केअर सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अहमदपूर तालुक्यातील वऱ्हाड लग्नासाठी लातूर आले होते. या वऱ्हाड्यातील नवरदेव आणि आईसह इतर २३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील एका धार्मिक कार्यक्रमामुळे एकत्र आलेल्या तब्बल १३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आता लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यक्रम कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरतायत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

- Advertisement -

सार्वजनिक कार्यक्रमात लोकांची उपस्थित कमी असावी. शिवाय कोरोनाचे त्रिसुत्रीचे पालन करावे, असे प्रशासनाकडून सातत्याने सांगितले जात आहे. तरी देखील लोकं प्रशासनाने दिलेले आदेश आणि कोरोनाचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. लातूरमध्ये ४८ कोविड केअर सेंटर होते, त्याच्यापैकी फक्त लातूर शहरातलं कोविड केअर सेंटर सुरू होत. बाकीचे सगळे रुग्ण नसल्यामुळे कोविड केअर सेंटर बंद होते. मात्र एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यामुळे अहमदपूरमधले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा – नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक! लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी प्रशासनाची घ्यावी लागणार परवानगी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -