घरताज्या घडामोडीपुणे : दिवसभरात २३४ रुग्णांची नोंद; तर १० जणांचा मृत्यू

पुणे : दिवसभरात २३४ रुग्णांची नोंद; तर १० जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात दिवसभरात २३४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ८९० वर गेली आहे. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात दिवसभरात २३४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ८९० वर गेली आहे. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ४५८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

दरम्यान, कोरोनावर उपचार घेणाऱ्या २३६ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६ हजार ४४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड शहरात ६८ नवे रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात ६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १ हजार २४६ वर पोहोचली आहे. तर महानगर पालिकेच्या हद्दीतील एकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या १ हजार २४६ वर पोहचली आहे. तर मृतांची एकूण संख्या ४१ वर गेली आहे. आज ६१ जण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत ८०० पेक्षा अधिक जण करोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus : आज राज्यात २,७८६ कोरोना रुग्णांची नोंद; तर १७८ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -