घरमहाराष्ट्रनव्या वर्षात 24 सार्वजनिक सुट्ट्या, प्रत्येकी दोन शनिवारी आणि रविवारी, संपूर्ण यादी...

नव्या वर्षात 24 सार्वजनिक सुट्ट्या, प्रत्येकी दोन शनिवारी आणि रविवारी, संपूर्ण यादी एका क्लिकवर…

Subscribe

मुंबई : डिसेंबर महिना सुरू होताच, वेध लागतात ते सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागताचे. पण सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षातील सुट्ट्यांबाबतची उत्सुकताही अनेकांना असते. विशेषत: शनिवार आणि रविवारी लागून येणाऱ्या सुट्ट्यांचा शोध नव्या कॅलेंडरमध्ये घेतला जातो. आता राज्य शासनाकडून सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जारी करण्यात आली असून त्यात 24 सुट्ट्या आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोन शनिवार आणि रविवारी आहेत.

नव्या वर्षात महाशिवरात्री (18 फेब्रुवारी 2023) आणि मोहर्रम (29 जुलै 2023) या दोन सार्वजनिक सुट्ट्या शनिवारी आहेत. तर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (19 फेब्रुवारी 2023) आणि दिवाळी अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन (12 नोव्हेंबर 2023) या दोन दिवशी रविवार आहे. रविवारला जोडून चार सुट्ट्या (सोमवार) आल्या आहेत. महाराष्ट्र दिन (1 मे 2023), महात्मा गांधी जयंती (2 ऑक्टोबर 2023), गुरुनानक जयंती (27 नोव्हेंबर 2023) आणि ख्रिसमस (25 डिसेंबर 2023) अशा या सुट्ट्या आहेत. तर, 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाची मंगळवारी आणि पारशी नववर्ष दिनाची 16 ऑगस्ट 2023 (बुधवारी) अशी लागून सुट्टी आली आहे.

- Advertisement -

याव्यतिरिक्त 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाची गुरुवारी, होळीची (धुळवड) 7 मार्च 2023 (मंगळवार), गुढी पाडव्याची 22 मार्च 2023 (बुधवार), रामनवमीची 30 मार्च 2023 (गुरुवार), महावीर जयंतीची 4 एप्रिल 2023 (मंगळवार), बकरी ईदची 28 जून 2023 (बुधवारी) रोजी सुट्टी आहे. तर, गुड फ्रायडे (7 एप्रिल 2023), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल 2023) आणि बुद्ध पौर्णिमा (5 मे 2023) या सुट्ट्या शुक्रवारी येतात.

- Advertisement -

गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 (मंगळवार), ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबर 2023 (गुरुवार), दसरा 24 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) आणि दिवाळी – बलिप्रतिपदा 14 नोव्हेंबर 2023 (मंगळवार) अशा सुट्ट्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -