घरCORONA UPDATECorona Update: महाराष्ट्रासह २४ राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत घट - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Corona Update: महाराष्ट्रासह २४ राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत घट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Subscribe

देशात कोरोनाचा हळूहळू सुधारताना दिसत आहे. आज देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा देणारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळेस महाराष्ट्रसह २४ राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत गेल्या आठवड्यापासून घट होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. आज २५ राज्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या एका दिवसातील नवीन रुग्णसंख्येपेक्षा कमी आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. २२ लाख १७ हजार ३२० नमुन्यांच्या झाल्या आहेत. ७ मे २०२१ रोजी नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर आता देशातील नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. १५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाची दररोजची रुग्णसंख्या १ हजार ते ५ हजार दरम्यान आहे. तर १३ राज्यात दररोज १ हजार पेक्षा नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होते.

२८ एप्रिल ते ४ मे कळात ५३१ जिल्ह्यांत कोरोनाचे दररोज १०० पेक्षा अधिक रुग्ण नोंदवले जात होते. तेच आता १९ मे ते २५ मे या काळात ३५९ जिल्ह्यांची संख्या झाली आहे. सध्या देशात लसीकरणाचे वेग काही मर्यादेपर्यंत वाढला आहे. आता पुरवठ्याच्या तीन शाखांमधील समन्वय आणि शिस्तबद्ध कामकाजासाठी मोठे प्रयत्न करायचे आहेत. जुलैपर्यंत लसीच्या ५१.६ कोटी मात्रांचा मोठा हिस्सा उपलब्ध होणार असून त्यांचा कार्यक्षम वापर करून घेतला गेला पाहिजे, अशी माहिती नीति आयोगाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – white fungus covid: पांढऱ्या बुरशीमुळे कोरोनाबाधित महिलेच्या आतड्यात झाली छिद्रे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -