घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणानुसार आता; २४ हजार शिक्षकांची भरती होणार

मराठा आरक्षणानुसार आता; २४ हजार शिक्षकांची भरती होणार

Subscribe

२४ हजार ऑनलाइन शिक्षक भरतीमध्ये १६ टक्के मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल आणि ही शिक्षक भर्ती वेळेत पूर्ण होईल याबाबत सरकार काळजी घेईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली.

मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्याआधी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला असला तरी शिक्षक भरतीत १६ टक्के मराठा समाजाला राखीव जागा ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. ती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मान्य केली. विधानसभेत आज शिक्षक भर्तीचा विषय तारांकित प्रश्नात उपस्थित झाला या चर्चेत सहभागी होताना, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी शिक्षक भर्तीचा निर्णय पूर्वी झाला असला तरी मराठा समजला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काल, २९ नोव्हेंबर रोजी झाला हा कायदा लागू करूनच ही शिक्षक भर्ती करण्यात यावी आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या १६ टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली.

वाचा : बोगस पटसंख्या दाखवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार – तावडे

- Advertisement -

शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा 

त्यावर उत्तर देताना होऊ घातलेल्या २४ हजार ऑनलाइन शिक्षक भरतीमध्ये १६ टक्के मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल आणि ही शिक्षक भर्ती वेळेत पूर्ण होईल याबाबत सरकार काळजी घेईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

वाचा : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची शिफारस

- Advertisement -

वाचा : मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर; विधेयक एकमताने मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -