घरक्राइमनागपूर : काका मंत्री असल्याचं सांगून कोटींचा गंडा; २५ लाखांचे सव्वा...

नागपूर : काका मंत्री असल्याचं सांगून कोटींचा गंडा; २५ लाखांचे सव्वा कोटी देतो सांगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Subscribe

25 लाखांच्या मोबदल्यात दोन दिवसांत 1.25 कोटी रुपये परत करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीने आकाश उमरे (रा. लांजी, बालाघाट) यांना २५ लाख रुपयांना गंडविले. माजी मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगून या टोळीने अनेक व्यक्तींची फसवणूक केली आहे.

25 लाखांच्या मोबदल्यात दोन दिवसांत 1.25 कोटी रुपये परत करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीने आकाश उमरे (रा. लांजी, बालाघाट) यांना २५ लाख रुपयांना गंडविले. माजी मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगून या टोळीने अनेक व्यक्तींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तसेच, या टोळीचा सुत्रधार हसनबागमधील कुख्यात आरोपी परवेज पटेल आणि कंचन गोसावीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. (25 lakhs Fraudulent 1 25 crores minister)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसानंतर २५ लाखांच्या मोबदल्यात १.२५ कोटी रुपये परत करणारी टोळी चोरीच्या वाहनांची विक्री, वाळूतस्करीसह अनेक अवैध धंद्यांशी निगडित आहे. या टोळीने आकाशला २५ लाखांच्या मोबदल्यात दोन दिवसानंतर १.२५ कोटी परत करण्याची बतावणी या आरोपींनी केली. मात्र अधिक तपासानंतर या प्रकरणात अवस्थीनगर मानकापूर येथील रहिवासी पराग दत्तात्रय मोहाडला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, कंचन दलालाच्या रुपाने काम करते. पराग याचे महाराष्ट्र आणि शेजारील राज्यातील एका माजी मंत्र्यांशी नाते आहे. तो स्वत:ला दोन्ही मंत्र्यांचा पुतण्या असल्याचे सांगतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माजी मंत्री आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत काढलेले भरपूर फोटो अपलोड केलेले आहेत. तो कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी कारमध्ये फिरतो. नागरिकांवर प्रभाव टाकण्यासाठी कोणतेही काम सहज करून देण्याचा दावा करतो. तसेच, माझे काका मंत्री आहेत, असे सांगून धमकी देतो.

या टोळीचा प्रमुख माजी मंत्र्यांशी नाते असल्याचे सांगायचा. याच कथित नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर पराग आणि त्याचे साथीदार आधी वाळूतस्करीतून वसुली करीत होते. त्यानंतर ते स्वत:च तस्करी करू लागले.

- Advertisement -

दरम्यान, किस्त (हप्ता) न दिल्यामुळे फायनान्स कंपन्या वाहने सिझ करतात. परागशी निगडित व्यक्ती वाहनांच्या फायनान्सचे काम करतात. त्यांच्या ओळखीचे लोक शेजारील राज्यातून किस्त न भरणाऱ्या वाहनांना कमी किमतीत खरेदी किंवा चोरी करीत होते. याशिवाय, या वाहनांना दुसऱ्या राज्यात पाठवून बनावट कागदपत्र आणि नंबरच्या आधारे चालवले जाते. यात आरोपींनी चांगलीच कमाई केली आहे.


हेही वाचा – बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला विचारले प्रश्न, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -