घरउत्तर महाराष्ट्रमध्यप्रदेशात २५% कांदा सडला, महाराष्ट्र मध्येही तीच परिस्थिती; जुलै-ऑगस्टमध्ये कांदा भाव खाणार?

मध्यप्रदेशात २५% कांदा सडला, महाराष्ट्र मध्येही तीच परिस्थिती; जुलै-ऑगस्टमध्ये कांदा भाव खाणार?

Subscribe

नाशिक : बदलत्या वातावरनामुळे कांद्याची प्रत खराब होत असल्याने कांदा बाजार समितीत कांदा आवक मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. उन्हाळ कांद्याला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान ४०० कमाल १२३५ तर सरासरी ७७५ रुपये दर मिळाला.या वातावरणामुळे कांद्याची प्रतवारी खालावली असून चाळीत कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कांद्याला कमी भाव मिळत आहे. कांद्याच्या मिळणार्‍या दरातुन शेतकर्‍यांच्या पदरी निराशा झाली आहे.

कांदा सडण्याचे प्रमाण लक्षात घेता आणि बाजार समितीत येणारी प्रचंड आवक बघता जुलै- ऑगस्टमध्ये कांदा तेजीत येऊ शकतो.या पावसाचा फटका महाराष्ट्र राज्याबरोबर मध्यप्रदेशलाही बसला आहे.मध्यप्रदेश मध्ये या पावसाचा कांद्याला २५ टक्के फटका बसला आहे. मध्यप्रदेश राज्यातून कांदा निर्यात होत नव्हता मात्र भारतीय बाजाराची गरज तो भागवत होता. या मध्यप्रदेश च्या कांद्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाशिकच्या कांदा दराला उतरती कळा लागली आहे.मात्र यंदा मध्यप्रदेश मधून २५ टक्के उत्पादन घटल्याने देशासह परदेशात राज्याच्या कांद्याला मागणी वाढेल आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये कांदा तेजीत राहण्याची शक्यता असल्याचे कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्या आशिया खंडातील प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव मध्ये कांदा ४ ते १२ रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. तर आपल्या पेक्षा कमी दरात आखाती देशाला पाकिस्तान कांदा देत आहे. या हंगामात पाकिस्तान मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असून मलेशिया आणि आखाती देशातून पाकिस्तानी कांद्याला मागणी वाढली आहे तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान चे वातावरण बिघडल्याने झाल्याने डॉलर अस्थिर झाला आहे भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा कांदा आणखी स्वस्त मिळत असल्याने त्यांच्या कांद्याची मागणी वाढत आहे.याचा फटका आपल्याला बसत आहे.

पुढील महिन्यात नाफेडही कांदा खरेदी करण्यास सुरवात करेल तर पुढील वर्षी २०२४ च्या लोकसभा निवडणुका जाहीर होणार असल्याने केंद्र सरकार कांद्याला खूप काही तेजीत जाऊन देईल असे वाटत नाही.त्यामुळे पुन्हा ग्राहक हीत डोळ्यासमोर ठेवून कांदा दर स्थिर करण्यासाठी प्रयत्न होतील याचा फटका मात्र कांदा उत्पादकाना बसेल अशी शक्यता आहे. येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याची १७ हजार क्विंटल आवक होईन कांद्याला किमान ४०० कमाल १२३५ तर सरासरी ७७५ रुपये दर जाहीर झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -