घरठाणे२५ पोलीस अधिकारी, अंमलदारांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव

२५ पोलीस अधिकारी, अंमलदारांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव

Subscribe

ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय येथील संकल्प हॉल येथे बुधवारी  ठाणे शहर मधील एकूण २५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ठाणे शहर पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त ( प्रशासन ) संजय जाधव तसेच मुख्यालय उपायुक्त रूपाली अंबुरे  यांच्या हस्ते माननीय पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे ठाणे शहरातील उत्तम खेळाडू म्हणून पोलीस महासंचालक पदक ठाणे शहर पोलिस दलातील महिला पोलीस नाईक  देवकी देवीसिंग राजपूत यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

देवकी यांनी आत्तापर्यंत एकुण सात वेळा महाराष्ट्र राज्य  पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये जु-दो व कुस्ती या खेळामध्ये सलग सुवर्ण मेडल मिळाले आहे. तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्र पोलीस गेम्स मध्ये त्यांना महाराष्ट्र पोलीस दलामधील जु-दो व कुस्ती या दोन्ही खेळांमध्ये बेस्ट प्लेयर म्हणून किताब पटकावला आहे.  तसेच अखिल भारतीय पोलीस कुस्ती स्पर्धेमध्ये (राष्ट्रीय स्पर्धा मध्ये) रौप्यपदक व कांस्यपदक मिळवलेले असून त्या जु-दोच्या ब्लॅकबेल्ट धारक आहेत.  देवकी ही महाराष्ट्रातील एकमेव कुस्ती पटू आहे जिने (NIS) कुस्ती प्रशिक्षक होणेसाठी पतीयाळा (पंजाब राज्य) येथील ०१ वर्षाचा (NIS) एन.आय.एस (२०२०-२१) हा डिप्लोमा कोर्स ‘‘A’’ ग्रेडने उत्तीर्ण  आहेत. तसेच ती पहिली महिला महाराष्ट्र तेलगंना केसरी चा मान मिळवला व ठाणे महानगरपालीका यांनी देखील बेस्ट खेळाडु म्हणुन देवकीला गौरवण्यात आले.

- Advertisement -

सध्या देवकी ही महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट मध्ये सहाय्यक क्रीडा अधिकारी/ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे सर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जुनेद खान सर यांचे मार्गदर्शनाखाली घाटकोपर येथे कुस्ती या खेळाचे प्रशिक्षण देत असून तिने नोव्हेंबर मध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलीस गेम्स पुणे येथे महाराष्ट्राला सात पदके मिळवून दिली.  त्यांनी केलेल्या उत्तीर्ण कामगिरीमुळे त्यांना ‘‘ पोलीस महासंचालक पदक’’ मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -