Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र NCP : राष्ट्रवादी काँग्रेसची 25 वर्षे; रौप्य महोत्सवी वर्षात पक्षाचे पदार्पण

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसची 25 वर्षे; रौप्य महोत्सवी वर्षात पक्षाचे पदार्पण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दिल्लीत देखील पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस. आजच्या दिवशी 25 वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची स्थापना केली गेली. त्यावेळी पी ए संगमा व तारिक अन्वर हे देखील शरद पवार यांच्या साथीला होते. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या आधी काँग्रेस पक्षामध्ये होते. परंतु इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याचा हक्क काय? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवार यांनी काँग्रेस मधून काढता पाय घेतला आणि त्यानंतर जन्म झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. दहा वाजून दहा मिनिटे ही वेळ दाखवणार. दोन पाय व गजराची कळ असलेलं सदृश्य घड्याळ हे या पक्षाचा अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी या चिन्हाला मात्र फक्त आता राज्यातच परवानगी दिलेली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढ उतार पाहिले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आणि कायमच हा पक्ष सर्वांच्या चर्चेचा विषय राहिला.

हेही वाचा – Devendra Fadnavis : मुंबईच्या डबेवाल्याना मिळणार हक्काचे घर; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

- Advertisement -

आज राष्ट्रवादा काँग्रेस पक्ष रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणार असल्याने मुंबई आणि पुणे येथील कार्यालयांसह अनेक कार्यालयात पक्षाचे झेंडावंदन करण्यात येणार आहे. तर या निमित्ताने आज शरद पवार यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकारणीतले काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन हा अहमदनगरमध्ये साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती. पण त्यानंतर हवामान खात्याने हवामानाबाबत दिलेल्या माहितीमुळे या ठिकाणचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु या निमित्ताने आज राज्यभरात पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चित्रफित प्रदर्शित करण्यात आली आहे. याबाबतचे ट्वीट देखील पक्षाकडून करण्यात आले आहे. “आचार, विचार, निर्धार फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #NCP #रौप्यमहोत्सवीराष्ट्रवादी” असे ट्वीट पक्षाच्या अधिकृत अकांऊटवरून करण्यात आले आहे.

- Advertisment -