घरमहाराष्ट्रआज ठरणार महाराष्ट्राचे पुढचे सत्ताधारी! प्रशासन सज्ज!

आज ठरणार महाराष्ट्राचे पुढचे सत्ताधारी! प्रशासन सज्ज!

Subscribe

राज्यातील ३२३९ उमेदवारांचे भवितव्य उलगडणार,25 हजार निवडणूक कर्मचारी सज्ज,राज्यात २६९ केंद्रांवर मतमोजणी

विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघात आपले नशीब आजमवणार्‍या तब्बल ३२३९ उमेदवारांचा फैसला गुरुवारी (दि.24) होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून २५हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यातील २६९ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१.१३ टक्के मतदान झाले आहे.

राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचार्‍यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी माहिती दिली.

- Advertisement -

सीसीटीव्ही कॅमेरे
स्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्राँग रूममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.

चोख सुरक्षा व्यवस्था
मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत.

- Advertisement -

मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक
संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल
विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांना तत्काळ निकाल उपलब्ध करण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या result.eci.gov.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे. तसेच voterhelpline या अ‍ॅपवरही निकाल उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -