घरमहाराष्ट्रराज्यात २५६० नवे रुग्ण, १२२ करोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात २५६० नवे रुग्ण, १२२ करोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

राज्यात बुधवारी २५६० नवे रुग्ण सापडले असून, करोनाबाधितांची संख्या ७४ हजार ८६० झाली आहे. त्याचप्रमाणे १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा २५८७ वर पोहोचला आहे. बुधवारी ९९६ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ३२ हजार ३२९ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

१ मे ते १ जूनदरम्यान राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून १ जूनला तो देशाच्या सरासरीपेक्षा ( ४.७४ % ) देखील कमी झालेला आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील करोना प्रसाराचा वेग मंदावत आहे. १ मे रोजी रुग्ण वाढीचा दर ७.७६ टक्के होता. त्याचवेळी रुग्ण दुपटीचा वेग ९.२७ दिवस इतका होता. मात्र मे महिन्यामध्ये रुग्ण वाढीचा दर सातत्याने कमी होण्याबरोबरच रुग्ण दुपटीचा वेगही वाढताना दिसत आहे. १५ मे रोजी रुग्णवाढीचा दर ६.२३ टक्केे तर रुग्ण दुपटीचा वेग ११.५६ दिवस झाला. त्याचप्रमाणे ३० मे रोजी हाच दर ४.७२ टक्के, तर दुपटीचा वेग १५.२६ दिवस झाला. १ जूनला ४.१५ टक्के, तर १७.३५ दिवस झाला.

- Advertisement -

राज्यात १२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यामध्ये मुंबई ४९, उल्हासनगर ३, नवी मुंबई ३, ठाणे २,मीरा भाईंदर १, वसई विरार १, भिवंडी १, धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १,नंदूरबार १, पुणे १९, सोलापूर १०, कोल्हापूर २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबाद १, अकोला २, तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. बुधवारी नोंद झालेल्या मृत्युंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. १२२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.

तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये ( ७२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्युंपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्युंपैकी मुंबई ३०,सोलापूर १०, औरंगाबाद ६, नवी मुंबई ३, धुळे ३, जळगाव २, कोल्हापूर २, ठाणे २, अहमदनगर १, अकोला १, नंदूरबार १,पुणे १ , उल्हासनगर १, वसई, विरार १ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -