Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइम26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबरला नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबरला नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Subscribe

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस भारत कधीच न विसरणारा दिवस आहे. या दिवशी मुंबईवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये एकूण 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस भारत कधीच न विसरणारा दिवस आहे. या दिवशी मुंबईवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये एकूण 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. (Mumbai attack terrorist firing read the story of 26 november attack.)

हेही वाचा : Sharad Pawar : 60 वर्षांनी काँग्रेस अन् शरद पवारांचा बालेकिल्ला ढासळला, उभारण्यासाठी लागणार कस…

- Advertisement -

आज या हल्ल्याला एकूण 16 वर्षे पूर्ण झाले असून आजही आठवण झाली की अंगावर शहारे उभे राहतात. 26/11 हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले. देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. मच्छिमार असल्याचे सांगून त्या दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईत पाऊल टाकले होते. सर्व 10 दहशतवादी पाकिस्तानातील कराची येथून बोटीने मुंबईला रवाना झाले होते. भारतीय नौदलाला चकमा देण्यासाठी, त्यांनी वाटेत एका भारतीय बोटीचे अपहरण केले आणि जहाजावरील सर्व लोकांना ठार मारले होते.

हेही वाचा : Atal Setu : शिवनेरीच्या अटल सेतू प्रवासाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद

- Advertisement -

दहशतवादी रात्री आठच्या सुमारास कुलाब्याजवळील मासळी मार्केटमध्ये उतरले. त्यांच्यावर स्थानिक मच्छिमारांना संशय आल्यानंतर त्यांनी तेथील स्थानिक पोलिसांनाही माहिती दिली होती. याच्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला सुरुवात झाली. त्यानंतर कुलाब्यामधून दहशतवादी आपआपल्या ठरलेल्या जागेवर पोहोचले. रात्री 9.30 वाजता दहशतवाद्यांची एक टोळी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहोचली. प्रत्येकाच्या हातात AK-47 रायफल होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. या हल्लेखोरांमध्ये अजमल कसाबचा देखील  समावेश होता. ज्याला सुरक्षा दलांनी जिवंत पकडले आणि त्याला फाशी देण्यात आली. सीएसटी रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झाली. यानंतर काही वेळातच विलेपार्ले परिसरात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली.

त्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध ठिकाणांवर हल्ले केले होते. मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल आणि नरिमन हाऊस यांना लक्ष्य करण्यात आले होते. ताज हॉटेलला दहशतवाद्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दिवस चकमक सुरू होती. हे ऑपरेशन तीन दिवस चालले असून यावेळी एनएसजी कमांडोंची मदत घेण्यात आली. एनएसजी कमांडोंनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या शौर्यामुळे भारतावर आलेले हे संकट टळले. या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले होते. मात्र नंतर त्याला फाशी देण्यात आली.

हेही वाचा : PAN Card : आता मिळणार बारकोड असलेले पॅनकार्ड; सरकारचा मोठा निर्णय

26/11 रोजी मुंबईवर सागरी मार्गाने झालेला हा दहशतवादी हल्ला पहिलाच हल्ला नव्हता. या पूर्वी भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणारे आरोपी देखील सागरी मार्गानेच आले होते. तसेच मुंबईमध्ये 1996 साली तब्बल 12 साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स या स्फोटकांचे साठेही दिघी आणि शेखाडी या बंदरावर उतरूनच मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. मात्र तरीही सागरी सुरक्षेचा प्रश्न फारसा गांभीर्याने घेतला जात नाही, असे सांगण्यात येते. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवरील दहशतवादी हल्ला घडविण्यात आला ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -