घरमहाराष्ट्र26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण

26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण

Subscribe

26 नोव्हेंबर 2008 साली देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला आज जवळपास 14 वर्ष पूर्ण झाली. परंतु आजही लोक तो भयावह हल्ला विसरलेले नाहीत. मुंबईवरील दहशतवादाचे सावट आजही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शहारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

14 वर्षांपूर्वी समुद्रमार्गी आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईला लक्ष करत हल्ला केला. या हल्ल्यात 166 निष्पाप नागरिक आणि 34 विदेशी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच जवळापास 700 लोक जखमी झाले होते आणि 18 पोलिस जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यात पोलिसांनी 9 दहशतवाद्यांना जागीच ठार केले होते. तर अजमल कसाब याला जिवंत पकडले होते. मुंबईवरील या भीषण हल्ल्यानंतर केंद्रातील एनएसजी कमांडोंच्या धर्तीवर मुंबईत शक्तिशाली अशा शीघ्र कृती दल आणि फोर्स वनची स्थापना करण्यात आली. तसेच अतिरेकी हल्ला परतवून लावण्याचे प्रशिक्षण या पथकांना देण्यात आले. तसेच आता मुंबईमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटीव्ही यंत्रणा देखील सज्ज करण्यात आली आहे.

- Advertisement -

आज या हल्ल्याचा स्मृतिदिन असल्याने मुंबई पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, हॉटेल ताज, हुतात्मा स्मारक, गेट वे ऑफ इंडिया चा ठिकाणांसोबतच शहरातील विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालये, सामाजिक संस्थांकडून शहीद जवानांना आदरांजली देण्यात आली.

 

- Advertisement -

हेही वाचा :

तिथेच सणसणीत कानाखाली का नाही दिली?; राऊतांचा अमृता फडणवीसांना सवाल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -