घरदेश-विदेशमणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे 26 विद्यार्थी विशेष विमानाने मुंबईत दाखल

मणिपूरमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे 26 विद्यार्थी विशेष विमानाने मुंबईत दाखल

Subscribe

मागच्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले होते. त्यांना आता महाराष्ट्र सरकारने सुखरुप परत आणलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे

मागच्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले होते. त्यांना आता महाराष्ट्र सरकारने सुखरुप परत आणलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ( 26 Maharashtra students stuck in Manipur arrived in Mumbai by special flight )

मणिूपर IIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले काही महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना सुखरुप राज्यात आणलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. या विद्यार्थ्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी विनंती शिंदे यांनी या दोघांनाही केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे यांनी बंगळुरु येथून मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. महाराष्ट्र सरकारच्य मदतीमुळे मणिपूरमध्ये अडकलेले विद्यार्थी मणिपूरमधून सुखरुप बाहेर पडले आहेत. आता सर्व विद्यार्थी शासनाच्या मदतीने एका विशेष विमानाने महाराष्ट्रात सा़डेसात वाजेपर्यंत पोहोचले आहेत. आता हे विद्यार्थी त्यांच्या गावाकडे रवाना झाले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले असल्याचे समजताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. याचबरोबरच मुख्यमंत्र्यानी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच त्यांना विशेष विमानाने आसाममार्गे महाराष्ट्रात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आज हे विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार

मणिपूर येथील दंगलीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,, तातडीने दखल घेऊन प्रयत्न केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सुखरूप परत आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : आदित्य गजभिये, तुषार आव्हाड, आयुष दुबे, शिवसंपत तागिरीसा, गौतम चौरसिया, साजन पौणिकर, मोहित खडपे, भूषण पावरा, वृक्षाल गणवीर, विकास शर्मा, तन्मय मादव, मडिकोंडा अविनाश, रोहित कोरी, आयुष रवी, ज्ञानदीप छुटे, प्रतिक कोडग, पुनर्वसू इंगोले, साईजित निकम, अनन्य बॅनर्जी, शंतनू कुंभीरकर, क्रिश कलगुडे, फाल्गुन महाजन, मधुरिका इंदूरकर, रोनिल नाडर आणि अश्वगंधा पराडे.

पालकांनी घेतली पवारांची भेट

मणिपूरयेथील आयआयआयटी संस्थेत अजूनही काही विद्यार्थी अडकलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे पालक मला भेटले. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

( हेही वाचा: मणिपूरमधील हिंसाचार हा केरळ राज्याला बदनाम करण्याचा डाव, भविष्यात…; राष्ट्रवादीचा घणाघात )

बुधवारी (३ मे) मणिपूर राज्यातील चुरचंदपूर जिल्ह्यात असलेल्या तोरबांग येथे ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढला होता. यानंतर या मोर्चाला हिंसक वळण आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये आग धूमसताना दिसत आहे. राज्यातील हिंसाचार वाढत असल्याने या ठिकाणचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले आहे. मणिपूरमध्ये आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे, हे मृतदेह इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, चुराचंदपूर आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय गोळ्या लागल्याने 100 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर RIMS आणि जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -