पुण्याचा धोका वाढतोय; २४ तासांत आढळले २,६०१ रुग्ण, ४४ जणांचा मृत्यू

पुण्यात २४ तासांत २ हजार ६०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५४ हजार १३ वर पोहोचला आहे.

2601 new corona patient found and 44 deaths today in pune
पुण्याचा धोका वाढतोय; २४ तासांत आढळले २,६०१ रुग्ण, ४४ जणांचा मृत्यू

राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पुण्यात २४ तासांत २ हजार ६०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५४ हजार १३ वर पोहोचला आहे. तर यापैकी १ हजार ३८७ रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

सोमवारी पुण्यात २ हजार ६०१ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली होती. तर ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून मास्क वापरण्याबाबत देखील कठोर पावले उचलली जात असून याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. पुण्या सारख्या इतर शहरांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क न घातला बाहेर पडल्यास ५०० ते १००० रुपये दंड आकारण्यात येत आहेत.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ८,२४० नवे रूग्ण; १७६ जणांचा मृत्यू